राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा; १८ जानेवारीच्या बैठकीत एकत्र येण्यावर झाले होते एकमत

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाष्य केले असून, १८ जानेवारीला झालेल्या बैठकीत दोन्ही गटांनी एकत्र येण्याचे ठरवले होते, असा दावा केला आहे.

Published On: 

Supriya Sule-Sunetra Pawar on Ajit Pawar

पुणे, 13 नोव्हेंबर: राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, अनेक नेते सातत्याने शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. या घडामोडींवर भाष्य करताना, आपण विलिनीकरणाच्या एका बैठकीला उपस्थित होतो आणि १८ जानेवारीला झालेल्या त्या बैठकीत एकत्र येण्यावर एकमत झाले होते, असा मोठा खुलासा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

या विलिनीकरणाच्या चर्चेवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘योग्य वेळी योग्य निर्णय होतील,’ असे सूचक विधान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे, ‘माझा भाऊ गेला, तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,’ अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विलिनीकरणाच्या बैठकीत अजितदादांची भूमिका एकत्र येण्याचीच होती. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या असल्या तरी, त्यावेळी एकत्र येण्याचे ठरले होते ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच मागील निवडणुका एकत्रितपणे लढल्या गेल्या. ‘दुर्दैवाने दादांचा अपघात झाला. त्याचे खूप दुःख असून आजही पावलोपावली त्यांची आठवण येते. पण दादानंतर आजची परिस्थिती बदलली आहे,’ असेही पाटील यांनी नमूद केले.

पक्षात वैयक्तिक मतापेक्षा सांघिक मताला महत्त्व असते आणि अंतिम निर्णय पक्षप्रमुखच घेतात, असे सांगून पाटील म्हणाले की, १८ जानेवारीच्या बैठकीसाठी ‘दादा’ आपल्याकडे आले होते. त्यानंतर पवार साहेबांसोबत बारामतीला जाऊन चर्चा झाल्यानंतरच निर्णय झाला होता. मध्यंतरी शरद पवार रुग्णालयात असल्याने नवीन कोणतीही चर्चा झाली नाही. आपण कोअर कमिटीचे सदस्य असून आता बैठक बोलावल्यास नक्की जाऊ. सध्या तरी विलिनीकरणाबाबत आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील आठवड्यात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता असून, त्यावेळी कोण कोणाला भेटले आणि नेमकी काय चर्चा झाली, हे समजेल. दोन्ही पक्षांचे प्रमुख, दोन्ही कोअर कमिटी आणि नंतर आमदार, अशी ही प्रक्रिया असते. १७ डिसेंबरला झालेल्या चर्चेतील सर्वच गोष्टी उघड करता येत नाहीत. सोय-गैरसोयीचा भाग नंतरचा असला तरी, ‘आता दादाच नाहीत, त्यामुळे काय सांगायचे,’ असे म्हणत पाटील यांनी आपले मत मांडले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही