दिल्ली, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. “ज्या दिवशी भाऊ गेला, त्याच दिवशी विलिनीकरणाचा मुद्दा संपला,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांची भेट घेत असल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. यावर स्पष्टीकरण देताना सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात, त्यामुळे यात काहीही नवीन नाही. सध्या तरी विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादा होते तेव्हा विलिनीकरणावर चर्चा सुरू होती, त्यांच्या जाण्यानंतर दोन-तीन दिवस काही घडामोडी घडल्या, मात्र अजितदादांच्या निधनाने सर्वच संपले आणि दोन्ही गट एकत्र येणार नाहीत, हे आपण पूर्वीच सांगितल्याचे त्या म्हणाल्या.
अजित पवार गटाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट हा त्या गटाचा अंतर्गत प्रश्न आहे. “दुसऱ्यांच्या घरात मी का डोकावू?” असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना विचारला.
दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेले अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीला हवे असल्याचा आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चा फेटाळल्या असून, मुख्यमंत्र्यांसोबत दिवाळीच्या शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








