Share

Uddhav Thackeray: राम मंदिर मुद्यावर उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करणार

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा निषेध करत उद्धव ठाकरे यांनी ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

Uddhav Thackeray

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्द्यावर मोठी भूमिका मांडत ‘राम रक्षा आंदोलन’ (Ram Raksha Aandolan) सुरू करण्याची घोषणा केली. राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीचा निषेध करत त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Bajpayi) यांनी ‘अब हिंदू मार नहीं खायेगा’ असे म्हटले होते. आता मी म्हणतो, ‘हिंदू माफ नहीं करेगा’. येत्या रविवारी दादर येथील मारुती मंदिराजवळ दुपारी 4 वाजता एकत्र येऊन ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करण्यात येईल.”

भाजपच्या सत्तेचे मूळ राम मंदिर

ठाकरे यांनी आरोप केला की, भाजपच्या सत्तेचा पाया राम मंदिर आंदोलनात आहे. त्या आंदोलनात अनेक शिवसैनिक आणि हिंदू समाजाने सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, आज त्याच राम मंदिराच्या नावावर राजकारण केले जात आहे. आमदार आणि खासदार फोडण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

देशातील प्रश्नांवरही भाष्य

देश आणि राज्यात अनेक गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभे असताना कोणीही जबाबदारी स्वीकारत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे. भाजपच्या सत्तेचा पाया राम मंदिर आहे आणि त्या आंदोलनात आमचाही मोठा वाटा होता,” असे ते म्हणाले.

राम मंदिर आंदोलनाची आठवण

राम मंदिर आंदोलनाच्या काळात देशभरातील हिंदूंनी अनेक संकटांचा सामना केला. गोध्रा, अहमदाबाद दंगल आणि मुंबई बॉम्बस्फोट यांसारख्या घटनांचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, त्या भावनांचे राजकीय भांडवल भाजपने केले. राम मंदिराचा मुद्दा उचलण्यापूर्वी भाजपचे केवळ दोन खासदार होते, मात्र या आंदोलनानंतर पक्षाला मोठे राजकीय यश मिळाले.

चोरीच्या पैशांवर गंभीर आरोप

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, मंदिरावरच दरोडा टाकला जात आहे. या कथित चोरीतील पैशांचा वापर इतर पक्ष फोडण्यासाठी केला जात असल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशीही त्यांनी मागणी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही