Share

‘या’ गटातील आमदार, खासदार बंडखोरीच्या तयारीत? इतर पक्षही अलर्ट मोडवर!

शिवसेना ठाकरे गटातील बंडानंतर आता राष्ट्रवादीतील आमदार-खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी वेग घेतला असून सर्व पक्ष अलर्ट मोडवर आहेत.

Published On: 

'या' गटातील आमदार, खासदार बंडखोरीच्या तयारीत? इतर पक्षही अलर्ट मोडवर!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटीच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटातील (Shivsena Thackeray Gat) सहा खासदारांनी शिंदे गटात (Shinde Gat) प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार (MLA) आणि खासदारांच्या (MP) संभाव्य बंडखोरीच्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातील आमदार फुटणार असल्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही.”

शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतील आमदार आणि खासदारही वेगळा निर्णय घेणार आहे, अशी चर्चा असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. पक्षातील सर्व आमदार आपल्यासोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शरद पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार (Yugendra Pawar) देखील उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गटाकडून राबवण्यात आलेल्या “ऑपरेशन टायगर”च्या चर्चांमुळे इतर पक्षही अलर्ट मोडवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आमदार आणि खासदारांशी संपर्क ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटानेही खासदारांची बैठक घेत पक्षातील स्थितीचा आढावा घेतला होता. काही खासदार बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काहींनी ऑनलाइन सहभाग नोंदवला होता. आता आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही