शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज, मोहितचा खणखणीत चौकार; भारताने नवव्यांदा जिंकला अंडर-१९ आशिया कप

अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवत नवव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारताने विजय मिळवला.

Published On: 

India U19 cricket team celebrating historic win over Pakistan in Asia Cup final

ओमान, 14 नोव्हेंबर: ओमानमध्ये खेळवल्या गेलेल्या १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या (U19 Asia Cup) अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा थरारक पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज असताना मोहित उलवाने मारलेल्या खणखणीत चौकारामुळे भारताने नवव्यांदा आशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरले.

अल अमिरात येथील मिनिस्ट्री टर्फ-२ मैदानावर हा अंतिम सामना पार पडला. विजयासाठी ३३८ धावांचे विशाल लक्ष्य गाठताना शेवटच्या षटकात भारताला ८ धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानी स्पिनर अहमद हुसेन हा गोलंदाजी करत होता. शेवटचा १ चेंडू आणि ३ धावा अशी रंगतदार स्थिती असताना स्ट्राइकवर असलेल्या मोहित उलवाने थेट बाऊंड्री मारून भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. यावेळी नॉन-स्ट्रायकरवर चिगुरपती वेंकटा उभा होता. या ऐतिहासिक विजयासह भारताने साखळी फेरीतील पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली.

तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानने ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा सलामीवीर उस्मान खान याने ११ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०७ धावांचे शतक झळकावले.

उस्मान व्यतिरिक्त अब्दुल कादिर आणि कर्णधार फरहान युसूफ यांनीही महत्त्वपूर्ण अर्धशतके केली. कादिरने ५४ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि ८ षटकारांसह ८० धावांची स्फोटक खेळी साकारली. तसेच कर्णधार फरहानने ६० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ६३ धावांचे योगदान दिले. मात्र, भारताच्या युवा संघाने हे मोठे आव्हान यशस्वीपणे पार करत पाकिस्तानचे आशिया कप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही