Share

बजेटनंतर सोन्याचा ‘धोबीपछाड’; एकाच दिवसात ५८०० रुपयांनी भाव घसरले, चांदीचीही दाणादाण!

बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात सोनं ५८९० रुपयांनी तर चांदी २३,९८० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Published On: 

Gold Rate Drop: बजेटनंतर सोनं ५८०० रुपयांनी स्वस्त!

तुम्ही लग्नसराईसाठी सोनं खरेदी करायचा प्लॅन करत होतात आणि बजेटकडे डोळे लावून बसला होतात का? जर हो, तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकीच दिलासादायक बातमी आहे. बजेटमध्ये सोन्या-चांदीच्या करात (Tax) कोणताही बदल झाला नसला, तरी मार्केटमध्ये मात्र मोठी उलथापालथ झाली आहे. बजेटनंतर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी घसरण झाली असून, एकाच दिवसात सोन्याने चक्क ५,८९० रुपयांची डुबकी मारली आहे.

काल (१ फेब्रुवारी २०२६) २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४८ हजार २४० रुपये होता. तो आज थेट १ लाख ४२ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच एका झटक्यात सोनं जवळपास ६ हजारांनी स्वस्त झालंय. दुसरीकडे चांदीच्या दरात तर मोठी पडझड पाहायला मिळाली. आठवडाभरापूर्वी ३ लाखांचा टप्पा ओलांडणारी चांदी आज २ लाख ४२ हजार ५२० रुपये प्रति किलोवर आली आहे. कालच्या तुलनेत चांदी तब्बल २३,९८० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Gold Price Today

स्थानिक बजेटमध्ये बदल झाला नसला तरी, जागतिक पातळीवर ‘गेम’ फिरला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेडरल रिझर्व्हच्या चेअरमनपदी केविन वॉर्श (Kevin Warsh) यांची नियुक्ती करण्याच्या तयारीत आहेत. या बातमीने डॉलर (Dollar) मजबूत झाला आणि त्याचा थेट फटका सोन्या-चांदीला बसला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदी ४ टक्क्यांनी गडगडलं, ज्याचे पडसाद आता भारतीय सराफा बाजारात उमटले आहेत.

या पडझडीमुळे नवीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र ज्यांनी वरच्या भावात गुंतवणूक केली होती, त्यांचे धाबे दणाणले आहेत. जळगावसारख्या सुवर्णनगरीतही (Suvarnanagari) दरात मोठी तफावत दिसून येत असून, जीएसटी वगळता दरात ७ हजारांची घसरण नोंदवली गेली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही