Share

‘सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली म्हणजे…’; कोकण हार्टेड गर्लची ‘ती’ पोस्ट तुफान चर्चेत!

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत! “जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर,” म्हणत ट्रोलर्सना सुनावले खडेबोल. वाचा सविस्तर.

Published On: 

Ankita Walawalkar Post: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर अंकिताचे भाष्य!

दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्याच्या वाटेवर चालणं सोपं नसतं, याची जाणीव सध्या संपूर्ण महाराष्ट्र करून देतोय. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने राजकारण सुन्न झालेलं असतानाच, सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. मात्र, सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे दोन गट पडलेत. काहींनी या धाडसी निर्णयाचं स्वागत केलंय, तर काहीजण ट्रोलिंगच्या कामाला लागलेत. याच ट्रोलर्सना आता ‘बिग बॉस’ फेम आणि ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिने आपल्या हटके स्टाईलमध्ये आरसा दाखवला आहे.

अजितदादांच्या जाण्याने बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारीचा तो विमान अपघात अजूनही कुणी विसरलेलं नाही. अशा स्थितीत सुनेत्रा पवारांचा 31 जानेवारीला झालेला शपथविधी हा अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला. यावर भाष्य करताना अंकिता वालावलकरने एक अत्यंत संवेदनशील पोस्ट लिहिली आहे.

Ankita Walawalkar Post On Sunetra Pawar

अंकिता म्हणते, “सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं.” तिने पुढे लिहिलंय की, अशा प्रसंगी काहीजण कोलमडतात तर काहीजण खंबीरपणे उभे राहतात. हे दोन्ही मार्ग मानवीच आहेत. सोशल मीडियावर बसून दुसऱ्याच्या मनातला थांगपत्ता न लागताच ट्रोल करणं सोपं असतं, पण समोरची व्यक्ती कोणत्या वादळातून जातेय, याचा विचार होणं गरजेचं आहे. “मतभेद असू शकतात, पण माणुसकी टिकवणं हीच खरी गरज आहे,” असा सल्लाही तिने नेटकऱ्यांना दिला आहे.

दुसरीकडे, प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास ही खाती सोपवली आहेत. मात्र, अजितदादांकडे असलेलं अर्थ आणि नियोजन खातं सध्या कोणालाही देण्यात आलेलं नाही. हे खातं स्वतः मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवणार असून, येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प तेच सादर करतील, अशी माहिती समोर येत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही