🕒 1 min read
“शेती आता फक्त बैलांच्या जोरावर नाही, तर तंत्रज्ञानाच्या बळावर चालणार,” हे स्वप्न पाहणाऱ्या नेत्याची आठवण आज संसदेतील अर्थसंकल्पानंतर पुन्हा एकदा झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये (Budget 2026) ‘डिजिटल शेती’वर दिलेला भर पाहून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे भारावून गेले आहेत. “आज अजितदादा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कृषी बजेट 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत मिळाले आहेत, जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
Union Budget 2026
या अर्थसंकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ‘Bharat Vistar’ हे एआय (AI) आधारित कृषी टूल. यावर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “गेल्या वर्षीच्या राज्य अर्थसंकल्पात आदरणीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीत AI वापरण्यासाठी 550 कोटींची तरतूद केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने ‘महा-विस्तार’ ॲप आणले. आज केंद्राने त्याच धर्तीवर योजना आणून अजितदादांच्या दूरदृष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे.” आता शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत हवामान आणि पिकांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
अर्थसंकल्पात केवळ पारंपरिक पिकेच नाहीत, तर काजू, नारळ, चंदन आणि कोको यांसारख्या ‘हाय व्हॅल्यू’ पिकांवर भर देण्यात आला आहे. “शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा गेमचेंजर निर्णय ठरेल,” असे भरणे यांनी सांगितले. तसेच मत्स्यपालनासाठी देशभरात 500 नवीन ‘अमृत जलाशय’ उभारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली या केंद्रीय योजनांचा फायदा महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भरणे यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! चंदन, काजू अन् नारळाच्या शेतीसाठी सरकारने उघडली तिजोरी
- Budget 2026 : मोबाईल, टीव्ही, AC खरेदी करताय? मग थांबा! आता ‘इतक्या’ हजारांची होणार बचत
- बजेटच्या एक दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; चांदी तब्बल 72 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किमतीही कोसळल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











