Share

बजेटच्या एक दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; चांदी तब्बल 72 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किमतीही कोसळल्या

अर्थसंकल्पापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदी तब्बल 72,500 रुपयांनी स्वस्त झाली असून सोन्याचे भावही 3,500 रुपयांनी खाली आले आहेत.

Published On: 

Gold Silver Price Crash: बजेटच्या दिवशीच चांदी 72 हजारांनी कोसळली!

“अर्थसंकल्पाच्या दिवशी खिशाला कात्री लागेल की दिलासा मिळेल?” असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना, सराफा बाजारातून मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे. बजेटच्या (Budget 2026) ठीक एक दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी घसरण झाली आहे. ज्या चांदीच्या दराने काही दिवसांपूर्वी सर्व रेकॉर्ड मोडले होते, ती चांदी आता एका झटक्यात तब्बल 72 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत, तर ग्राहकांसाठी मात्र ही ‘सुवर्णसंधी’ ठरू शकते.

आज (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यापूर्वीच शनिवारी (31 जानेवारी) जागतिक बाजारात घडलेल्या घडामोडींचा मोठा परिणाम किंमतींवर झाला. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोने-चांदीची जोरदार विक्री झाली, ज्यामुळे दर कोसळले.

Gold Silver Price Crash

सराफा बाजारात चांदीच्या दरात सुमारे 19 टक्क्यांची घसरण झाली आहे. शनिवारी चांदी तब्बल 72,500 रुपयांनी खाली आली. सध्या चांदीचा भाव 3 लाख 12 हजार रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या आठवड्यात चांदीने 4 लाख 40 हजारांचा टप्पा ओलांडला होता, पण आता हा फुगा फुटल्याचं चित्र आहे. अवघ्या दोन दिवसांत दर जमिनीवर आल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे, सोन्याच्या दरातही मोठी ‘पडझड’ पाहायला मिळाली. सोन्याचे भाव 3,500 रुपयांनी (2.07%) घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 65 हजार 500 रुपयांवर आले आहेत. गुरुवारी सोन्याने 1 लाख 83 हजारांचा उच्चांक गाठला होता. मात्र, आठवडाभरात झालेल्या विक्रीच्या लाटेने सोन्याला पुन्हा जुन्या पातळीवर आणून ठेवले आहे.

आता बजेटमध्ये सरकार सोने-चांदीवरील कस्टम ड्युटीबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर करात कपात झाली, तर दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही