Share

जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; किमतीत झाली मोठी घसरण!

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोने ९०० रुपयांनी तर चांदी २,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Published On: 

Gold Price Today updates with gold and silver coins on a surface

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे भाव अचानक कोसळल्यास ग्राहकांची पहिली प्रतिक्रिया काय असेल? नव्या महिन्याची सुरुवातच आज ग्राहकांसाठी आणि सोन्यात पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.

सराफा बाजारात १ जुलै रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) लक्षणीय घसरण पाहायला मिळाली. कालपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.४५ लाख रुपयांच्या आसपास होता, तो आज थेट ९०० रुपयांनी घसरून १.४४ लाख रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात तर आज तब्बल २,००० रुपयांची मोठी कपात झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today

मुंबई, पुणे आणि नागपूर या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,४०,१३० वर आला आहे. याच शहरांमध्ये दागिने बनवण्यासाठी लागणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२८,४५० आणि १८ कॅरेटचा भाव ₹१,०५,१०० इतका नोंदवला गेला आहे.

नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४०,१६० वर पोहोचला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि लखनऊमध्ये हाच दर ₹१,४०,२८० आहे, तर चेन्नईत सोन्याचे दर सर्वाधिक म्हणजेच ₹१,४५,०८० प्रति १० ग्रॅम इतके आहेत. चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर आज चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे.

पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि जळगावसह देशातील अनेक भागांत आज एक किलो चांदीचा भाव थेट ₹२,३५,००० वर आला आहे. चेन्नई वगळता देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये चांदीचे दर याच पातळीवर स्थिर आहेत. चेन्नईमध्ये मात्र एक किलो चांदीसाठी ₹२,४४,९०० मोजावे लागत आहेत. त्यामुळेच चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सराफा बाजारातील जाणकरांच्या मते, जर तुम्ही लग्नसराईची खरेदी किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही खरोखरच एक सुवर्णसंधी ठरू शकते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दरांपासून सध्या ग्राहकांना थोडा ब्रेक मिळाला आहे.

बाजारपेठेतील हा वेगवान चढ-उतार लक्षात घेता, ग्राहकांनी प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यापूर्वी आपल्या स्थानिक सराफा व्यापाऱ्यांकडून दरांची पुन्हा एकदा खात्री करून घेणे केव्हाही सोयीचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही