Share

Ladki Bahin Yojana: महिलांना मिळणार का 3000 रुपयांचा लाभ? जाणून घ्या सत्य

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसून जून-जुलैचे 3000 रुपये एकत्र मिळणार का याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana

मुंबई : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जुलै महिना सुरू झाला असला तरी अनेक महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे जूनसोबतच जुलै महिन्याचा लाभही एकत्र मिळणार का, याकडे लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Government Scheme)

मार्च-एप्रिलमध्ये मिळाले होते 3000 रुपये

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. यापूर्वी सरकारने मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिले होते. त्यामुळे पात्र महिलांना एकाच वेळी 3000 रुपयांचा लाभ मिळाला होता. त्यानंतर मे महिन्याचाही हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला. मात्र, ई-केवायसी पूर्ण न करणे आणि पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या काही महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

जून-जुलैचे 3000 रुपये एकत्र मिळणार?

जून महिना संपून जुलै सुरू झाला आहे, मात्र जून महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे मार्च-एप्रिलप्रमाणे यावेळी जून आणि जुलै महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्र खात्यात जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 12 ते 15 जुलैदरम्यान जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जुलै हप्त्याबाबत अद्याप माहिती नाही

जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या फक्त जून महिन्याचा प्रलंबित हप्ता देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 3000 रुपये एकत्र मिळणार की नाही, यासाठी सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही