Aaryavir Sehwag: बाप तसा बेटा, ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. पण क्रिकेटच्या मैदानावर हे प्रत्यक्षात घडताना पाहिलंय का? वीरेंद्र सेहवागची तीच आक्रमक स्टाईल आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतेय.
वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याची फलंदाजीची दहशत अजूनही कायम आहे. आणि आता हीच दहशत त्याचा मुलगा आर्यवीर सेहवाग पुढे चालवताना दिसतोय. सध्या सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (DPL) आर्यवीरने आपल्या वडिलांसारखेच हुबेहूब फटके मारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
आर्यवीर सेहवागचे फटके आणि जुन्या आठवणींना उजाळा
दिल्ली प्रीमियर लीगने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात आर्यवीर वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळताना सेहवागसारखाच कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर ड्राईव्ह मारताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना जुन्या वीरूची आठवण आली नसती तरच नवल. बाप-लेकाच्या स्टाईलमधलं हे साधर्म्य सध्या चर्चेचा विषय ठरलंय.
या हाय-स्कोरिंग सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्जने वेस्ट दिल्ली लायन्सचा २१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल दिल्लीने तब्बल २३२ धावांचा डोंगर उभारला होता.
सेंट्रल दिल्लीकडून सिद्धार्थ जूनने ३३, तर समर्थ सेठने ३७ धावा फटकावल्या. पण खऱ्या अर्थाने रंगत आणली ती मनी ग्रेवालने. त्याने अवघ्या १६ चेंडूत ४२ धावांची वादळी खेळी केली. दुसरीकडे, वेस्ट दिल्लीच्या मनन भारद्वाजने ३ विकेट्स घेत चांगली गोलंदाजी केली.
२३३ धावांचा पाठलाग करताना वेस्ट दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पण त्यानंतर त्यांना एकापाठोपाठ धक्के बसले. आर्यवीर सेहवागही या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. क्रिश यादव (४६) आणि अंकित कुमार (६१) यांनी जोरदार झुंज दिली, पण अखेर त्यांचा संघ २११ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाहेर जेवायला जाताय? तुकाराम मुंढेंनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नक्की तपासा
- पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!
- तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











