अंडर-१९ आशिया कप विजयानंतर आर्यवीर सेहवागवर कौतुकाचा वर्षाव, वैभव सूर्यवंशीची खास पोस्ट

अंडर-१९ आशिया कप विजयानंतर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आर्यवीर सेहवागचे विशेष अभिनंदन केले आहे.

Published On: 

Vaibhav Sooryavanshi congratulates Aaryavir Sehwag for Under-19 Asia Cup 2026 performance

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: ओमानमध्ये झालेल्या अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपदावर मोहोर उमटवली. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेटचे भविष्य मानल्या जाणाऱ्या युवा खेळाडूंवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विशेष प्रसंगी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनेही आपली प्रतिक्रिया देत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागचे (Aaryavir Sehwag) खास अभिनंदन केले आहे.

भारताच्या वरिष्ठ संघासाठी आधीच १० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची आकडेवारी शेअर केली. त्याने आर्यवीरला टॅग करत “Star boiiiiii @aaryavirsehwag” अशी पोस्ट लिहिली आहे. आर्यवीरने या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी करत ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा बहुमान पटकावला.

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आर्यवीर ३६१ धावांसह पहिल्या स्थानावर राहिला. पाकिस्तानचा उस्मान खान ३४५ धावांसह दुसऱ्या, भारताचा कर्णधार एल. राजचंदानी २४३ धावांसह तिसऱ्या, बांगलादेशचा एम. डी. अहसान अल मोमिन २३५ धावांसह चौथ्या आणि अफगाणिस्तानचा एस. फैजल १६७ धावांसह पाचव्या स्थानावर राहिला.

अंतिम सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. भारतासमोर ३३८ धावांचे महाकाय आव्हान होते. ५० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहित उलवाने चौकार ठोकत भारताला १ विकेट राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तळाच्या फळीत फलंदाजीला येत अवघ्या २६ चेंडूत ४९ धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या मोहितला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

मोहितच्या या खेळीपूर्वी भारताला कर्णधार लक्ष्य राजेश राजचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी भक्कम सुरुवात करून दिली. लक्ष्यने १०१ चेंडूत ८०, तर आर्यवीरने ६१ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. मधल्या फळीत मनल चौहानने ३२ चेंडूत ४७ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.

या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य पार करणाऱ्या या युवा खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणाला, “काय सामना होता! काय शेवट! अंडर-१९ आशिया कपच्या फायनलमध्ये ३३८ धावांचा पाठलाग करत पाकिस्तानला हरवण्यासाठी खऱ्या जिगरची गरज असते. लक्ष्यच्या ८०, आर्यवीरच्या ५८ धावा आणि त्यानंतर चमत्कार हवा असताना मनल चौहान आणि मोहित उलवाचा जलवा. हा एक अविश्वसनीय विजय आहे. या युवा चॅम्पियन्सचा अभिमान वाटतो.”

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही