Share

रोबोटने सलमानला दाखवला ॲटिट्यूड? भर कार्यक्रमात सलमान खानने हात पुढे केला, पण….

सलमान खानचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका रोबोटने सुरुवातीला भाईजानशी हात मिळवण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Published On: 

Salman Khan Viral Video: अरे बापरे! रोबोटने सलमानला दाखवला ॲटिट्यूड?

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) समोर आला की भल्याभल्यांची बोलती बंद होते. भाईजानच्या एका लूकवर चाहते फिदा होतात. पण, लाखोंच्या गर्दीत सलमानला चक्क ‘इग्नोर’ केल्याचा प्रकार घडलाय, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? होय, नुकतंच एका कार्यक्रमात असं काही घडलं की, खुद्द सलमानलाही हसू आवरलं नाही.

सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक विडिओ (Video) तुफान व्हायरल होत आहे. हा किस्सा घडलाय ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’ (ISPL) च्या उद्घाटन सोहळ्यात. या कार्यक्रमात सलमान खान उपस्थित होता. तिथे एका ‘रोबोट’ला पाहून भाईजान जाम खुश झाला. लहान मुलासारख्या कुतूहलाने सलमानने त्या रोबोटशी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला, पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही!

Salman Khan Viral Video

सलमानने हात पुढे केला तरी रोबोटने कोणतीही हालचाल केली नाही. जणू काही तो सलमानला ‘ॲटिट्यूड’ दाखवत होता. हा प्रसंग पाहून आजूबाजूला एकच हंशा पिकला. अखेर तिथे उभ्या असलेल्या एका तंत्रज्ञाने रोबोटचा सेन्सर तपासला आणि काही सेकंदात रोबोट ॲक्टिव्ह झाला. त्यानंतर त्याने सलमानशी शेक-हँड केला. हे पाहून सलमानलाही स्वतःचं हसू आवरलं नाही आणि त्याने रोबोटचं कौतुक केलं.

हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिलंय, “अखेर भाईजानला ॲटिट्यूड दाखवणारा कोणीतरी भेटला.” तर दुसऱ्याने मजेत म्हटलंय, “रोबोट भाईवर नाराज दिसतोय.” काहींनी तर “भाईचा स्वॅग रोबोटला झेपला नाही,” अशी कोटी केली आहे.

दरम्यान, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. भारत-चीन संघर्षावर आधारित हा सिनेमा 17 एप्रिल 2026 रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये चित्रांगदा सिंह आणि भाईजानची जोडी दिसणार असून, अपूर्व लाखियाने याचं दिग्दर्शन केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही