Share

Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! चंदन, काजू अन् नारळाच्या शेतीसाठी सरकारने उघडली तिजोरी

अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! चंदन, काजू, कोको आणि नारळाच्या लागवडीसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. जुन्या बागांना आता मिळणार नवसंजीवनी.

Published On: 

Budget 2026: चंदन, काजू, नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

“शेती परवडत नाही,” असं म्हणणाऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी आज संसदेतून एक नवी आशा जागवली आहे. आता शेतात फक्त धान्य नाही, तर अक्षरशः ‘पैसे’ पिकणार आहेत! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ (Union Budget 2026) सादर करताना पारंपरिक पिकांच्या पलीकडे जात शेतकऱ्यांसाठी ‘हाय व्हॅल्यू’ पिकांचे दरवाजे उघडले आहेत.

सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी, विशेषतः दक्षिण भारत आणि कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये चंदन, काजू, कोको आणि नारळाच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे.

Union Budget 2026

भारत हा जगातील नारळाचा ‘किंग’ आहे, पण जुन्या झाडांमुळे उत्पादन घटत असल्याची खंत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. यावर तोडगा म्हणून सरकारने नारळाच्या जुन्या आणि निष्प्रभ बागा काढून तिथे नवीन, जास्त उत्पादन देणारी रोपे लावण्यासाठी विशेष योजना जाहीर केली आहे. देशातील तब्बल ३ कोटी लोकांचे पोट या व्यवसायावर अवलंबून असल्याने हा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो. तसेच, कच्चा काजू आणि कोकोच्या उत्पादनात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी सरकार खास मिशन राबवणार आहे.

‘पुष्पा’ सिनेमामुळे रक्तचंदनाची चर्चा झाली, पण आता वास्तवातही चंदन शेतकऱ्यांचे नशीब पालटणार आहे. चंदनाचे सांस्कृतिक महत्त्व ओळखून, सरकारने चंदन लागवड आणि त्याच्या ‘व्हॅल्यू चेन’ (Value Chain) विकासासाठी राज्य सरकारांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चंदनाच्या शेतीला कायदेशीर आणि व्यावसायिक प्रतिष्ठा मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, ईशान्य भारत आणि डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी अक्रोड (Walnut), बदाम आणि पाइननट्स यांसारख्या महागड्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. थोडक्यात, आता शेतकऱ्यांनी केवळ पोटभरणीची पिके न घेता, जास्त नफा देणाऱ्या पिकांकडे वळावे, असाच सरकारचा स्पष्ट संदेश आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही