Share

Budget 2026 : मोबाईल, टीव्ही, AC खरेदी करताय? मग थांबा! आता ‘इतक्या’ हजारांची होणार बचत

अर्थसंकल्पात गॅझेट प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. मोबाईल, टीव्ही आणि एसीवरील कस्टम ड्युटी 20% वरून 10% केल्याने ग्राहकांची हजारो रुपयांची बचत होणार आहे.

Published On: 

Budget 2026: Mobile, TV, AC स्वस्त! कस्टम ड्युटीत मोठी कपात

“खिशाला कात्री लागणार की दिलासा मिळणार?” दरवर्षी बजेटच्या दिवशी प्रत्येक सर्वसामान्याला हाच प्रश्न पडतो. पण यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गॅझेट प्रेमींसाठी ‘बजेटच्या पोतडीतून’ एक मोठी खूशखबर बाहेर काढली आहे. तुम्हाला जर आयफोन किंवा महागडा एसी परदेशातून मागवायचा असेल, तर आता तुमचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करताना अर्थमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) थेट 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणली आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार असून हजारो रुपयांची बचत होणार आहे.

Union Budget 2026

अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मोबाईल, टॅबलेट आणि एसीच्या आयातीवरील खर्च कमी होणार आहे. परदेशातून ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना किंवा बाहेरून वस्तू आणणाऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ मिळेल.

एअर कंडिशनर (AC) : उन्हाळ्याच्या तोंडावर ही मोठी बातमी आहे. जर तुम्ही 40,000 रुपयांचा एसी आयात केला, तर पूर्वी त्यावर सुमारे 27,500 रुपये टॅक्स लागायचा. आता हा टॅक्स कमी होऊन 21,900 च्या घरात येईल. म्हणजेच, तुमचे थेट 5,600 रुपये वाचणार आहेत.

स्मार्टफोन आणि टॅबलेट : आजकाल प्रत्येकाला लेटेस्ट फोन हवा असतो. आता 30,000 रुपयांचा मोबाईल आयात करताना बेसिक ड्युटीमध्येच 1,500 ते 2,000 रुपयांची घसघशीत बचत होऊ शकते.

टीव्ही (TV) : स्मार्ट टीव्ही घेणाऱ्यांसाठीही ‘अच्छे दिन’ आहेत. 50,000 रुपयांच्या टीव्हीवर किमान 2,500 रुपयांपर्यंत बचत होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय प्रामुख्याने ‘वैयक्तिक आयातीवर’ (Personal Import) लागू आहे. त्यामुळे तुम्ही जर आंतरराष्ट्रीय वेबसाइटवरून खरेदी करत असाल, तर तुम्हाला थेट फायदा होईल. स्थानिक दुकानांमध्ये कंपन्या हा फायदा ग्राहकांपर्यंत पास करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, आयातीचा खर्च कमी झाल्याने बाजारात स्पर्धा वाढून दर काही प्रमाणात खाली येतील, अशी अपेक्षा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही