Share

Budget 2026 : मोदी सरकारला ‘बंपर’ लॉटरी! आरबीआय देणार ‘इतके’ लाख कोटी; आकडा पाहून विरोधकही अवाक!

बजेट 2026 मध्ये मोदी सरकारला मोठी लॉटरी! आरबीआय आणि बँकांकडून सरकारी तिजोरीत जमा होणार 3.16 लाख कोटी रुपये. वाचा सविस्तर आकडेवारी.

Published On: 

Budget 2026: सरकारला लॉटरी! RBI कडून 3.16 लाख कोटींचा लाभांश

🕒 1 min read

तुमच्या खिशातले पैसे सरकार टॅक्स रूपाने घेतं, हे तुम्हाला माहितीय. पण सरकारचा खिसा नेमकं कोण भरतं? आणि तो ही असा-तसा नाही तर लाखो कोटींनी? रविवारी सादर झालेल्या बजेटमध्ये (Budget 2026) या प्रश्नाचं जे उत्तर मिळालंय, ते ऐकून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. सरकारच्या तिजोरीत आता आरबीआय आणि बँकांकडून पैशांचा पाऊस पडणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी रविवारी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी ‘गुड न्यूज’ दिली. 2026-27 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका मिळून केंद्र सरकारला 3.16 लाख कोटी रुपयांचा लाभांश (Dividend) देणार आहेत. सरकारसाठी हा आकडा एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे, यातला मोठा वाटा, म्हणजे अंदाजे 2.68 लाख कोटी रुपये एकट्या आरबीआयकडून मिळण्याची शक्यता आहे.

RBI Dividend To Government

तुम्ही विचार कराल, बँकांकडे एवढा पैसा आला कुठून? तर त्याचं कारण म्हणजे भारतीय बँकांचं सुधारलेलं आरोग्य. सरकारी बँकांचे ताळेबंद (Balance Sheets) आता भक्कम झाले आहेत. दुसरीकडे, रुपयाचं मूल्य सांभाळण्यासाठी आरबीआयने डॉलर्सची जी विक्री केली, त्यातून मोठं उत्पन्न मिळालं आहे. आरबीआय सरकारच्या पैशांचं व्यवस्थापन करते आणि त्यातून होणारा नफा ‘डिव्हिडंड’ म्हणून सरकारला देते.

मे 2025 मध्ये आरबीआयने सरकारला 2.69 लाख कोटींचा विक्रमी लाभांश दिला होता. आता 2026-27 मध्येही आकडा 2-3 लाख कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. हा पैसा हाती आल्यामुळे सरकारला आपली राजकोषीय तूट (Fiscal Deficit) कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. एकीकडे शेअर बाजारात एसटीटी (STT) वाढवल्याने नाराजी असताना, सरकारी तिजोरीसाठी मात्र हा लाभांश मोठा दिलासा ठरणार आहे.

(टीप- शेअर बाजार आणि अर्थकारणाशी संबंधित ही प्राथमिक माहिती आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या