Share

पाकिस्तानची ‘ती’ घोषणा अन् क्रिकेट विश्वात खळबळ; भारताविरुद्ध खेळण्यास दिला थेट नकार!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहणार? बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.

Published On: 

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानचा भारतासोबत खेळण्यास नकार! मोठी बातमी

“भारत-पाकिस्तान मॅचची तिकीटं काढून बसला असाल, तर ही बातमी तुमच्या पायाखालची जमीन सरकवेल!” क्रिकेटच्या मैदानावरून एक अत्यंत स्फोटक बातमी समोर आली आहे. येत्या रविवारी (15 फेब्रुवारी) कोलंबोमध्ये होणाऱ्या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यावर पाकिस्तानने चक्क बहिष्कार टाकला आहे. बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने हे टोकाचे पाऊल उचलल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या (T20 World Cup 2026) रणधुमाळीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कट्टर लढत होणार होती. मात्र, आता हा सामना होण्याची शक्यता मावळली आहे. यामागील कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) एक निर्णय. बांगलादेश सरकारने भारतात खेळण्याबाबत सुरक्षेच्या कारणास्तव चिंता व्यक्त केली होती. यानंतर आयसीसीने कठोर निर्णय घेत बांगलादेशला स्पर्धेतून डच्चू देत स्कॉटलंडला संधी दिली. आयसीसीच्या या निर्णयाने पाकिस्तान भडकला असून, त्यांनी निषेध म्हणून भारताविरुद्धच्या सामन्यावरच बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

IND vs PAK T20 WC

पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी भारताने तब्बल 6 वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाकिस्तानला केवळ एकदाच विजय मिळवता आला आहे (2021 मध्ये). 2007 चा तो रोमांचक फायनल असो किंवा 2022 मध्ये मेलबर्नवर विराट कोहलीने खेचलेला तो विजय… भारताने नेहमीच पाकिस्तानला रडवलं आहे.

आता पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे 15 फेब्रुवारीचा सामना रद्द होण्याची चिन्हे आहेत. आयसीसी यावर काय भूमिका घेणार आणि पाकिस्तानवर काही कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही