Share

ऑपरेशन टायगर यशस्वी? 6 खासदार शिंदेंच्या भेटीला, सातव्या नावाची चर्चा सुरू

ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून, त्यांच्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सातव्या खासदाराच्या दाव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

Published On: 

6 खासदार

मुंबई : शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना (शिंदे गट) सोबत जाण्याची भूमिका घेतली असून, आता हे सर्व खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नंदनवन निवासस्थानी दाखल झाले आहेत.

या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची भूमिका काही काळ संभ्रमात होती. मात्र अखेर त्यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने बंडखोर खासदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. “सहा नव्हे तर सात खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत,” असा दावा कदम यांनी केला आहे. त्यामुळे सातवा खासदार कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रामदास कदम यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे कोणतेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाहीत. तसेच आज सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी कदम यांनी शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली. “खासदार पक्ष का सोडत आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर निशाणा साधला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही