Share

Eetha shraddha kapoor: फडात प्रसूतीवेदनेने कळवळलेला श्रद्धा कपूरच्या त्या सीनने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली…

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनपटाचा थक्क करणारा टीझर प्रदर्शित.

Published On: 

eetha shraddha kapoor movie teaser

🕒 1 min read

Eetha Shraddha Kapoor: मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘ईठा‘ (Eetha shraddha kapoor) या चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील एका विशिष्ट दृश्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून सोशल मीडियावर या कथेची उत्सुकता कमालीची वाढली आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेला फड ; विठाबाईंच्या नृत्यआविष्काराची वाट  रसिकप्रेक्षक पहात असतात. याची जाणीव असणाऱ्या विठाबाई बॅकस्टेजला बाळाला जन्म देतात, स्वत:च नाळ तोडतात आणि थेट प्रेक्षकांसमोर स्टेजवर लावणी करायला उभ्या राहतात, हा सीन पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येत आहे.

विठाबाईंचा ऐतिहासिक जीवनप्रवास

एकेकाळी तमाशाच्या विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांचा हा बायोपिक आहे. देखणा चेहरा, गोड आवाज आणि अदाकारीच्या जोरावर त्यांनी गावोगावी तमाशाचे फड गाजवले. नऊ महिन्यांचे दिवस भरलेले असतानाही त्या कलेसाठी स्टेजवर उतरल्या होत्या. भर कार्यक्रमात वेदना असह्य झाल्यावर त्यांनी बॅकस्टेजला जाऊन एका तंबूत मुलीला जन्म दिला, स्वतः दगडाने नाळ ठेचली आणि दुसऱ्याच क्षणी पोटाला कपडा बांधून पुन्हा प्रेक्षकांसमोर नाचण्यासाठी उभ्या राहिल्या. हा थरारक आणि कलेप्रती असलेला त्यांचा अथांग त्याग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपट रीलीज आणि प्रेक्षकांची उत्सुकता

आपल्या कलेच्या जोरावर अनेक संकटांवर मात करत लोककलेला समाजात प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या एका महान कलाकाराचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. श्रद्धा कपूरने विठाबाईंची भूमिका अत्यंत ताकदीने साकारल्याचे टीझरवरून स्पष्ट होत आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या टीझरमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (eetha shraddha kapoor)

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही