🕒 1 min read
चित्रपटापूर्वीच गाणं तुफान व्हायरल
हे कल्ट गाणं २०१२ मध्ये आलेल्या ‘३’ या तमिळ सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटातलं होतं, ज्याचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केले होते. या चित्रपटात धनुष आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत होते. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच, १६ नोव्हेंबर २०११ रोजी हे गाणं रिलीज करण्यात आलं आणि अवघ्या काही तासांत ते इंटरनेटवर व्हायरल झाल. संगीतकार म्हणून अनिरुद्धचा हा पहिलाच सिनेमा होता, पण त्याच्या पहिल्याच गाण्याने इतिहास घडवला. दैनंदिन बोलण्यातले सोपे इंग्रजी शब्द वापरल्यामुळे तमिळ भाषा न समजणाऱ्या देश-विदेशातील श्रोत्यांनाही या गाण्याने वेड लावले. (Dhanush Famous Song)सोशल मीडियावर ‘कोलावरी डी’ ची क्रेझ
Dhanush Famous Song: गाणं प्रदर्शित होताच ट्विटरवर (X) ‘कोलावरी’ हा हॅशटॅग भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. पहिल्याच आठवड्यात या गाण्याने युट्युबवर ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले, तर पहिल्या १८ दिवसांत तब्बल ४१ लाख मोबाईलवर हे गाणं डाऊनलोड केलं गेलं. आज या गाण्याला युट्युबवर ६० कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. कोणत्याही मध्यस्थाशिवाय आणि मोठ्या जाहिरातीशिवाय थेट लोकांपर्यंत पोहोचलेलं हे गाणं भारतीय संगीत विश्वातील सर्वात यशस्वी गाण्यांपैकी एक मानलं जातं.📌 महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












