Share

Breaking : नाशिकमध्ये राजकीय भूकंप! गोकुळ गीते ‘जायंट किलर’, महायुतीचा डाव फसला?

नाशिक विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्या आघाडीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published On: 

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! गोकुळ गीते ‘जायंट किलर’, महायुतीचा डाव फसला?

नाशिक : नाशिक विधान परिषद (Vidhan Parishad Election) स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीत धक्कादायक कल समोर येत आहेत. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले गोकुळ गीते (Gokul Geete) यांनी पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या फेरीतील १५० मतांपैकी गोकुळ गीते यांनी १०० हून अधिक मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यांच्या या आघाडीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसह इतर उमेदवारांची चिंता वाढली आहे.

मतमोजणीपूर्वी गोकुळ गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते की, “मी केवळ प्रचार थांबवला होता, निवडणुकीतून माघार घेतली नव्हती. मतदारांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विजयाबाबत मला विश्वास आहे.”

पहिल्याच फेरीतील आकडे समोर आल्यानंतर गोकुळ गीते यांच्या दाव्याला बळ मिळताना दिसत आहे. त्यांच्या आघाडीमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून महायुतीमध्ये मतफुटी किंवा क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निकालाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून अंतिम निकालानंतर नाशिकच्या राजकारणातील चित्र स्पष्ट होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही