Share

AIineducation : शिक्षणात डिजिटल क्रांती! महाराष्ट्रातील 4 लाख शिक्षकांना मिळणार गुगलचे ‘एआय’ प्रशिक्षण

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशनमध्ये यांच्या संयुक्त करारातून ‘जनरेशन अल्फा’ पिढीसाठी पुढील दीड वर्षात राज्यभरातील तब्बल ४ लाख शिक्षकांना गुगल कंपनीमार्फत विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. (AIineducation) 

Published On: 

AI training for teachers

बदलत्या काळाची गरज ओळखून आणि ‘जनरेशन अल्फा’ या हायटेक पिढीच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अद्ययावत डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘गुगल फॉर एज्युकेशन’सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत पुढील दीड वर्षात राज्यभरातील तब्बल ४ लाख शिक्षकांना गुगल कंपनीमार्फत विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. (AIineducation)

गुगल कंपनी सोबत करारावर स्वाक्षरी

मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार संपन्न झाला. गुगलच्या वतीने जिओ आणि एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स, तर शिक्षण विभागाच्या वतीने सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’चा वापर केला जाईल. सुरुवातीला काही निवडक ‘मास्टर ट्रेनर’ तयार केले जातील आणि त्यांच्या माध्यमातून राज्यातील इतर सर्व शिक्षकांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचवले जाईल. यामध्ये शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख देण्याचाही समावेश आहे.

शाळांच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांना डोळ्यांसमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये आणि भाषा प्रयोगशाळांच्या वापराला मोठी चालना मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. (AIineducation) विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रशिक्षणाचा कोणताही आर्थिक भार राज्य सरकारवर पडणार नाही. दरम्यान, शिक्षकांना तंत्रस्नेही करतानाच राज्यातील शाळांमध्येही आवश्यक भौतिक व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार का, असा प्रश्न आता शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही