🕒 1 min read
पुणे (Maharashtra Monsoon) – आठ जूनपासून एकाच जागी अडकलेला मान्सून अखेर पुढे सरकणार का? उकाड्याने हैराण झालेल्या आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रासाठी आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोकणातील हर्णे आणि सोलापूर मुक्कामी थांबलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पावसाच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २३ जूनपासून दमदार बॅटिंगची शक्यता
सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनला गती देणारी नवीन हवामान प्रणाली तयार झाली आहे. त्यामुळेच २३ जूनपासून महाराष्ट्रासह देशातील इतर भागात मान्सून वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या अंदाजानुसार, २५ जून ते २ जुलै या काळामध्ये राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढलेला दिसेल. यातही प्रामुख्याने कोकण पट्ट्यात दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दुसरीकडे, आज काही जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह घाटमाथ्यावरील काही भागांना हवामान विभागाने आज ‘यलो अलर्ट’ जारी केला असून तिथे वादळी पावसाचा अंदाज आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, एका बाजूला पाऊस सक्रिय होत असताना विदर्भातील बहुतांश भागात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रेवती सुळेंच्या लग्नात पार्थ पवारांसोबत आलेली ‘ती’ काश्मिरी तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
- ओमराजे निंबाळकर धाराशिवच्या वाटेवर; कुटुंबावरील विकृत टीकेनंतर संतापले, आजच घेणार मोठा निर्णय?
- रेवती सुळेंच्या शाही लग्नात दिग्गजांची मांदियाळी; पण पार्थ पवारांसोबत आलेल्या ‘त्या’ चेहऱ्याचीच सर्वाधिक चर्चा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












