Share

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्हे अलर्टवर

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला.

Published On: 

Rain Alert

Monsoon Update : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यासंदर्भात महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट क्षेत्रांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून सक्रिय झाला असून, त्याचा विस्तार गुना आणि सीधीपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत झाला आहे. तसेच, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाट क्षेत्रांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)

आगामी दिवसांत राज्यात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता असून काही विशिष्ट भागांसाठी विशेष इशारे देण्यात आले आहेत. घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि संपूर्ण राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. काही जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश आणि गुजरातसह २३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी ७५ किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

पावसाचा इशारा

मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. मुंबई, ठाणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बीड, नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीपर्यंत असू शकतो. महत्त्वाचा इशारा देण्यात आल्यामुळे, अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. जून महिना एकूणच कोरडा गेला होता आणि महिन्याच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले. जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. आता त्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही