Share

‘श्वेता तुमची खूप मोठी फॅन आहे…’; भर लग्नात जया बच्चन आणि संजय राऊतांचा ‘तो’ मराठी संवाद चर्चेत

सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नात जया बच्चन आणि संजय राऊत यांचा मजेशीर संवाद रंगला, तर पार्थ पवारांसोबत आलेल्या कायनात धरने सर्वांचे लक्ष वेधले.

Published On: 

Jaya Bachchan interacting with Sanjay Raut at Revati Sule wedding in Mumbai

मुंबई – राजकारणात एकमेकांवर आगपाखड करणारे नेते आणि पडद्यावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज कलाकार जेव्हा एकाच छताखाली येतात, तेव्हा काहीतरी भन्नाट घडणार हे नक्की असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात रेवती सुळे हिच्या शाही विवाहसोहळ्यातही नेमके असंच काहीसं पाहायला मिळालं.

खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग यांचा विवाह नुकताच मोठ्या थाटात पार पडला. देशातील बडे उद्योगपती आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला चार चाँद लागले. पण, या गर्दीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती ठाकरे गट आणि बच्चन कुटुंबाच्या एका अनपेक्षित भेटीची.

जया बच्चन राऊतांना म्हणाल्या, ‘श्वेता तुमची खूप मोठी फॅन आहे…’

लग्नसोहळ्याच्या गर्दीत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि जया बच्चन यांची गाठ पडली. जया बच्चन यांनी राऊतांना चक्क ‘भाऊ’ अशी हाक मारत थेट मराठीत संवाद साधला. “तुम्ही श्वेताला भेटलात का?” असा थेट सवाल त्यांनी राऊतांना केला. त्यावर राऊतांनी होकारार्थी उत्तर देताच, शेजारी उभ्या असलेल्या रश्मी ठाकरे यांच्याकडे पाहत जया बच्चन हसत म्हणाल्या की, “श्वेता त्यांची खूप मोठी फॅन आहे.”

या अनपेक्षित कौतुकावर रश्मी ठाकरेही खळखळून हसल्या. विशेष म्हणजे, याच वेळी उद्योगपती अनिल अंबानी यांनीही राऊतांच्या खांद्यावर हात ठेवून हसऱ्या चेहऱ्याने या संवादाला दाद दिली. या खुमासदार भेटीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Who is Kainat Dhar

दुसरीकडे, याच लग्नात आणखी एका एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत एक तरुण चेहरा दिसला. थेट पवार कुटुंबासोबत आल्याने ‘ही तरुणी कोण?’ यावरून चर्चांना उधाण आले.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीचे नाव कायनात धर असून ती मूळची काश्मीरची आहे. सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेल्या कायनातचे पवार कुटुंबाशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. सुनेत्रा पवार यांनी काश्मीर दौऱ्यात तिच्याच घरी मुक्काम केला होता. एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी महाकाल मंदिरात पार्थ पवार आणि कायनात एकत्र दिसल्याचेही समोर आले होते. या शाही लग्नात कायनातच्या पारंपरिक आणि लक्षवेधी उपस्थितीने राजकीय वर्तुळात नव्याने कुजबूज सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही