🕒 1 min read
मुंबई – ‘स्त्री’ चित्रपटातून बॉक्स ऑफिस गाजवणारी आणि देशाची ‘नॅशनल क्रश’ असलेल्या श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) लग्नाची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. ३८ वर्षांची श्रद्धा नक्की कुणाच्या प्रेमात आहे आणि ती बोहल्यावर कधी चढणार? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. पण आता खुद्द श्रद्धानेच या प्रश्नावर मौन सोडलं असून, तिच्या एका उत्तराने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
चाहत्याचा प्रश्न आणि श्रद्धाचं उत्तर!
नुकतंच श्रद्धाने तिच्या एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओवर एका चाहत्याने थेट मुद्द्याला हात घालत विचारलं, “तू लग्न कधी करणार आहेस?” एरवी अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या श्रद्धाने यावेळी मात्र थेट उत्तर दिलं. ती म्हणाली, “मी करणार, लग्न करणार.” तिचं हे तीन शब्दांचं उत्तर सध्या आगीसारखं व्हायरल होत असून, ती लवकरच गुड न्यूज देणार असल्याचा अंदाज लावला जातोय.
Actress Shraddha Kapoor marriage
सध्या तिचं नाव पटकथा लेखक राहुल मोदी (Rahul Modi) याच्याशी जोडलं जात आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झाल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे, राहुल हा श्रद्धापेक्षा वयाने ३ वर्षांनी लहान आहे. राहुलचे वय ३५ असून श्रद्धा ३८ वर्षांची आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यालाही या जोडीने एकत्र हजेरी लावली होती.
श्रद्धाचं नाव याआधी ‘आशिकी 2’ फेम आदित्य रॉय कपूर, फरहान अख्तर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांच्याशीही जोडलं गेलं होतं. २०२४ मध्ये राहुल आणि श्रद्धाचं ब्रेकअप झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या, पण २०२५ मध्ये ही जोडी पुन्हा एकत्र दिसल्याने चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता श्रद्धाच्या या कबुलीमुळे ती लवकरच ‘मोदी’ कुटुंबाची सून होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- बावनकुळेंनी हद्दच केली! महापुरुषांच्या समोर ‘अश्लील’ डान्स, वरून म्हणाले – “हा तर महिलांचा आनंद!”
- Heart Health: जिम नको, कडक डाएट नको; दिवसाला फक्त ‘इतकी’ पावलं चाला, हार्ट अटॅकचा धोका होईल छुमंतर!
- ऑनलाईन फ्रॉड झालाय? रडू नका, तात्काळ हे काम करा; गेलेले पैसे परत मिळण्याची मोठी संधी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










