🕒 1 min read
मुंबई (Online Fraud)- तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो… ‘केवायसी अपडेट करा’ किंवा ‘बिल भरलं नाहीये’, तुम्ही घाईत लिंकवर क्लिक करता आणि पुढच्याच क्षणी खात्यातून हजारो रुपये गायब! काळजात धस्स होतं ना? सध्या डिजिटल युगात हे कोणासोबतही घडू शकतं.
अनेकजण फसवणूक झाल्यावर नशिबाला दोष देत गप्प बसतात किंवा पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवतात. पण थांबा, आता तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. जर तुम्ही ‘गोल्डन अवर’मध्ये (म्हणजेच फसवणूक झाल्या झाल्या लगेच) हालचाल केली, तर तुमचे पैसे परत मिळू शकतात. सरकारचं एक खास पोर्टल तुमच्या मदतीला धावून आलंय.
नेमकं काय करायचं?
सर्वात आधी, डोक्याला हात लावून बसू नका. तुमच्या फोनमध्ये https://cybercrime.gov.in हे पोर्टल उघडा. हे केंद्र सरकारचं अधिकृत पोर्टल आहे, त्यामुळे इथे तुमची माहिती सुरक्षित राहील.
प्रोसेस अगदी सोपी आहे:
१. वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला ‘File a complaint’ किंवा तक्रार नोंदवा असा ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करा. तिथे गेल्यावर टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करा.
२. ‘रिपोर्ट सायबर क्राईम’ (Cyber Crime) या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला नवीन युजर म्हणून रजिस्टर करावं लागेल. आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाका. तुमच्या फोनवर एक OTP येईल, तो टाकला की तुमचं लॉगिन झालं!
३. आता शांत डोक्याने घडलेला प्रकार लिहा. पैसे कधी कापले गेले? किती वाजता? कोणत्या लिंकवरून? हे सगळं सविस्तर मांडा.
४. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरावा महत्त्वाचा आहे. ट्रान्झॅक्शन आयडी, स्क्रीनशॉट किंवा आलेला मेसेज तिथे अपलोड करा.
५. तुम्हाला कोणावर संशय आहे का? असेल तर त्यांची माहिती द्या आणि Submit करा.
इतकेच नाही तर, तुमची तक्रार सबमिट होताच तुम्हाला एक मेसेज येईल आणि पोलीस प्रशासन तात्काळ कामाला लागेल. तुमचे पैसे ज्या बँक खात्यात वळते झाले आहेत, ते खाते गोठवण्याची प्रक्रिया यामुळे वेग घेते.
लक्षात ठेवा: सायबर भामटे हुशार असतात, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहिलात आणि वेळेत तक्रार केली, तर कष्टाचे पैसे नक्कीच वाचतील. त्यामुळे हा मेसेज सेव्ह करून ठेवा, कोणास ठाऊक कधी गरज पडेल!
📌 महत्वाच्या बातम्या
- Bigg Boss Marathi 6 : राजकीय एन्ट्रीवर रितेश भाऊंचा ‘तो’ डायलॉग व्हायरल!
- बांगलादेशचा ‘हट्ट’ पुरणार? भारताशी पंगा घेणं पडणार महागात; टी-२० वर्ल्डकपबाबत आयसीसीची मोठी खेळी!
- ‘स्वागत नही करोगे हमारा?’ सलमान खानची २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर सुनामी
- “लक्ष्मीकांत बेर्डे खूप मोठा माणूस होता, पण…”; उषा नाडकर्णींचा तो खुलासा, वाचून डोळ्यात येईल पाणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











