🕒 1 min read
पुणे – क्रिकेटच्या मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘नागिन डान्स’ वाला थरार आपल्याला माहिती आहेच, पण आता हा वाद मैदानाबाहेर गेलाय आणि तो चांगलाच विकोपाला गेलाय. बांगलादेशने घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती, पण आता Bangladesh ताळ्यावर येतोय का? असा प्रश्न पडलाय. कारण, भारताशी पंगा घेणं बांगलादेशला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही, याची जाणीव आता त्यांना होऊ लागली आहे.
बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahman) याला आयपीएलमधून वगळल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा (BCB) पारा चढला होता. या रागाच्या भरात त्यांनी थेट बांगलादेशमध्ये आयपीएलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली. इतकेच नाही तर, आगामी २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपचे (T20 World Cup 2026) आपले सामने भारतात नको, तर श्रीलंकेत घ्या, असा हट्ट धरत त्यांनी थेट आयसीसीला (ICC) पत्र लिहिलं होतं. यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि बांगलादेश बोर्डात तणाव निर्माण झाला होता.
Will T20 World Cup be played in India?
आता या प्रकरणात आयसीसीने उडी घेतली आहे. आयसीसीने मध्यस्थी करत दोन्ही बोर्डांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली आहे. बांगलादेश बोर्डाने आता “आम्ही ठिकाण बदलाच्या मागणीचा फेरविचार करतो,” असं सांगत थोडा वेळ मागितला आहे. मात्र, अंतिम निर्णय बांगलादेश सरकारशी चर्चा करूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आयसीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या खेळाडूंना भारतात पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन आयसीसीने दिले आहे. भारताशी पंगा घेतल्यास भविष्यात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, हे बीसीबीला आता उमजू लागले आहे. सध्याच्या नियोजनानुसार बांगलादेशचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. जर हे सामने श्रीलंकेत हलवले, तर लॉजिस्टिक्स आणि ब्रॉडकास्टर्सचा गोंधळ उडू शकतो.
त्यामुळे आता बीसीबी आपला हट्ट सोडून भारतात T20 World Cup 2026 खेळण्यास तयार होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘निवडणुकीत कोणी माफी मागत नसतं, पण…’; चव्हाणांची पाठराखण करत फडणवीसांनी विरोधकांची बोलती केली बंद!
- “राज साहेबांनी ‘हिरवं रक्त’ असलेल्यांशी युती केली, पक्ष सरेंडर केला”; धुरींचा भाजप प्रवेश करताच स्फोटक दावा!
- ‘पैसे वाटताना सापडला तर तिथेच बदडून काढीन’; खैरेंचा ‘तो’ इशारा अन् बावनकुळेंवर वैयक्तिक वार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









