🕒 1 min read
IND vs NZ Final: उद्या फायनलच्या महामुकाबल्यात पाऊस व्हिलन ठरणार की दव? हाच प्रश्न सध्या करोडो भारतीयांना सतावतोय. पण आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून एकदम ग्राऊंड लेव्हलची आणि १०० टक्के खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
रविवारी IND vs NZ T20 World Cup 2026 Final चा थरार रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी हवामान खात्याने (IMD) सर्वात मोठा आणि दिलासादायक अहवाल दिला आहे. उद्या अहमदाबादमध्ये पावसाची ०% शक्यता आहे.
दिवसभर कडक ऊन असेल आणि संध्याकाळी सामन्याच्या वेळी तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाविना पूर्ण ४० षटकांचा थरार पाहायला मिळणार हे आता निश्चित झालं आहे.
हवामानाची चिंता मिटली असली तरी, खरा सस्पेन्स खेळपट्टीवर आहे. आज शनिवारी सकाळीच बीसीसीआयच्या मुख्य क्युरेटर्सनी खेळपट्टीचा अंतिम आढावा घेतला आहे. उद्याच्या सामन्यासाठी खेळपट्टीवर शेवटचा ‘हेवी रोलर’ फिरवण्याचं काम सध्या सुरू आहे.
सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे ‘दव’ (Dew) फॅक्टर. संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होणार असल्याने दुसऱ्या डावात दव पडण्याची दाट शक्यता असते. दव पडल्यावर चेंडू ओला होतो आणि गोलंदाजांना तो पकडणं कठीण जातं.
हाच धोका टाळण्यासाठी आज संध्याकाळपासूनच मैदानावर ‘अँटी-ड्यू स्प्रे’ (Anti-dew spray) मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जो संघ टॉस जिंकेल तो दव फॅक्टर लक्षात घेऊन नक्कीच आधी गोलंदाजीचा निर्णय घेईल.
फायनलच्या आदल्या दिवशी खेळाडूंवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून आज ‘ऑप्शनल सराव’ ठेवण्यात आला आहे. उर्वरित खेळाडू हॉटेलमध्ये आराम करत असून, आज संध्याकाळी टीम इंडिया आणि न्यूझीलंडची अंतिम ‘स्ट्रॅटेजी मीटिंग’ पार पडणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











