🕒 1 min read
IND vs NZ Final: सेमीफायनलमध्ये ४ षटकांत तब्बल ६४ धावा देणाऱ्या वरुण चक्रवर्तीला फायनलमध्ये वगळलं जाईल, अशी सर्वांनाच खात्री होती. पण कॅप्टन सूर्यकुमार यादवने असा काही जुगार खेळलाय की भल्याभल्यांना धक्का बसला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टॉस झाल्यानंतर सूर्याने भारताची अधिकृत ‘प्लेईंग ११’ जाहीर केली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
टीम इंडियाने आपल्या ‘विनिंग कॉम्बिनेशन’मध्ये एकही बदल केलेला नाही! म्हणजेच सलग फ्लॉप ठरत असलेला अभिषेक शर्माच आज पुन्हा एकदा संजू सॅमसनसोबत ओपनिंगला येणार आहे. आणि सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हुकमी एक्का कुलदीप यादवला फायनलमध्येही बाकावरच बसावं लागलं असून सूर्याने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीवरच आपला विश्वास कायम ठेवला आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनेही कोणताही बदल न करता ‘सेम टीम’ मैदानात उतरवली आहे. सेमीफायनलमध्ये अवघ्या ३३ चेंडूंत नाबाद १०० धावा ठोकणारा त्यांचा सर्वात घातक फलंदाज फिन ऍलन आज पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांची परीक्षा पाहणार आहे. त्याला रोखण्याची मोठी जबाबदारी आता जसप्रीत बुमराहवर असेल.
न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सूर्याच्या सेनेला आता पहिल्यांदा बॅटिंग करावी लागणार आहे. आता याच न बदललेल्या ‘प्लेईंग ११’ च्या जोरावर सूर्या १ लाख ३२ हजार प्रेक्षकांसमोर इतिहास रचतो की हा मोठा जुगार टीम इंडियाच्या अंगलट येतो? याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ Final: मिचेल सँटनरने जिंकला टॉस! टीम इंडियाच्या हातातून निसटला सर्वात मोठा चान्स?
- अहमदाबाद पोलिसांनी रातोरात घेतला मोठा निर्णय! स्टेडियमबाहेर अभूतपूर्व बंदोबस्त
- मायकल क्लार्कने बुमराहबाबत केली मोठी भविष्यवाणी! न्यूझीलंडच्या गोटात उडाली खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











