Share

मायकल क्लार्कने बुमराहबाबत केली मोठी भविष्यवाणी! न्यूझीलंडच्या गोटात उडाली खळबळ

मायकल क्लार्कने जसप्रीत बुमराहबाबत मोठी भविष्यवाणी करत, तोच फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्दनकाळ आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरेल असा दावा केला आहे.

Published On: 

IND vs NZ Final, T20 World Cup, Jasprit Bumrah, Michael Clarke,

IND vs NZ Final – जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची दहशत जगभरात किती आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. उद्या रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्क ( Michael Clarke ) याने बुमराहबाबत एक अत्यंत मोठी भविष्यवाणी केली आहे.

उद्याच्या IND vs NZ Final मध्ये टीम इंडियाच्या विजयाची मदार कोणावर असेल? यावर बोलताना क्लार्कने संजू सॅमसन किंवा सूर्याचे नाव न घेता थेट बुमराहला गेमचेंजर ठरवले आहे. क्लार्क म्हणाला, “बुमराह हा जगातील सर्वोत्तम आणि सर्वात घातक गोलंदाज आहे. तो एक चमत्कार (Freak) आहे.”

क्लार्कने न्यूझीलंडला स्पष्ट इशारा दिला आहे की, “उद्याच्या फायनलमध्ये बुमराहच ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.” बुमराह कोणत्याही दबावाखाली मॅच फिरवण्याची ताकद ठेवतो, हे क्लार्कने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले.

फिन ऍलनने ३३ चेंडूंत शतक ठोकले असले तरी, बुमराहच्या अचूक यॉर्करसमोर त्याची डाळ शिजणार नाही, असाच क्लार्कच्या बोलण्याचा अर्थ आहे. आता उद्या १ लाख ३२ हजार प्रेक्षकांसमोर बुमराह न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या दांड्या कसा गुल करतो आणि क्लार्कची भविष्यवाणी खरी ठरवतो का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही