Share

सँटनरने फायनलआधी दिला थेट इशारा! भारतीयांची मने तोडण्यावर मोठं वक्तव्य

टी-२० विश्वचषकाच्या फायनलपूर्वी मिचेल सँटनरने १ लाख भारतीयांना शांत करण्याचा आणि ट्रॉफी जिंकून मने तोडण्याचा थेट इशारा दिला आहे.

Published On: 

IND vs NZ Final, T20 World Cup, Mitchell Santner

IND vs NZ – पॅट कमिन्सने २०२३ च्या विश्वचषकात जे केलं, तेच आता मिचेल सँटनर (Mitchell Santner) करणार का? टी-२० विश्वचषकाच्या फायनलला आता अवघे काही तास उरले असताना, न्यूझीलंडच्या कर्णधाराने असा काही माज दाखवला आहे की संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

उद्याच्या IND vs NZ Final पूर्वी सँटनरने पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि बोचरे वक्तव्य केले आहे. “१ लाख भारतीयांना स्टेडियममध्ये शांत करायला (Silence the crowd) आम्हाला नक्कीच आवडेल,” असा थेट इशारा त्याने दिला आहे.

इतक्यावरच न थांबता सँटनरने टीम इंडियाला खुलं आव्हान दिलं आहे. तो म्हणाला, “आम्ही या स्पर्धेत फेवरेट नसलो तरी, ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीयांची मने तोडायला (Breaking Hearts) आम्ही मागेपुढे पाहणार नाही.” सँटनरच्या या वक्तव्याने आता क्रिकेटमधील राजकारण चांगलंच तापलं आहे.

सूर्यकुमार यादवची सेना या गर्विष्ठ वक्तव्याचा बदला उद्या मैदानातच घेईल, असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे. न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी, उद्या वानखेडेवरच्या पराभवाचा बदला आणि सँटनरच्या या ‘माईंड गेम’ला उत्तर देण्यासाठी टीम इंडिया १०० टक्के सज्ज आहे!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही