डेल स्टेनने न्यूझीलंडची काढली लायकी! फायनलआधीच डिवचून उडवली खिल्ली

डेल स्टेनने न्यूझीलंडवर जोरदार निशाणा साधला असून उद्याची फायनल हरल्यास त्यांना अधिकृतपणे ‘चोकर्स’ चा टॅग देण्याची घोषणा केली आहे.

Published On: 

dale steyn vs nz

IND vs NZ Final – नेहमी दक्षिण आफ्रिकेला ‘चोकर्स’ म्हणणाऱ्यांना डेल स्टेनने (Dale Steyn) आता सणसणीत चपराक लगावली आहे. उद्याच्या फायनलच्या महामुकाबल्यापूर्वी या दिग्गज वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडवर अशी काही बोचरी टीका केली आहे की किवींच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

उद्याच्या IND vs NZ Final च्या पार्श्वभूमीवर बोलताना स्टेनने थेट न्यूझीलंडची लायकी काढली. तो म्हणाला, “सगळे आम्हाला म्हणजेच दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणतात. पण सत्य हे आहे की न्यूझीलंडने आमच्यापेक्षाही जास्त फायनल गमावल्या आहेत.”

स्टेन इथेच थांबला नाही. त्याने न्यूझीलंडला थेट आव्हान देत म्हटलंय, “उद्या जर ते हरले, तर मी ‘चोकर्स’चा टॅग अधिकृतपणे त्यांना देईन.” या वक्तव्यामुळे न्यूझीलंडवर उद्याच्या फायनलमध्ये आता अतिरिक्त दबाव असणार आहे.

याशिवाय स्टेनने भारताच्या विजयावर मोठा दावा केला आहे. “उद्या न्यूझीलंड भारताला हरवू शकत नाही, त्यासाठी भारताला स्वतःच खूप खराब खेळावं लागेल,” असा ठाम विश्वास त्याने व्यक्त केला. आता स्टेनच्या या डिवचण्यानंतर न्यूझीलंडचा संघ मैदानात काय कमाल दाखवतो की खरोखरच ‘चोकर्स’ ठरतो, हे पाहणे थरारक असेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही