IND vs NZ – फायनलची तिकिटे मिळाली नाहीत म्हणून निराश झाला आहात? आणि जर तुम्हाला ब्लॅकमध्ये तिकीट मिळत असेल, तर आताच थांबा! उद्याच्या ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी सुरक्षेचा इतका कडेकोट बंदोबस्त केला आहे की एका मुंगीलाही आत शिरता येणार नाही.
रविवारी होणाऱ्या IND vs NZ Final साठी तब्बल १ लाख ३२ हजार प्रेक्षक एकाच वेळी स्टेडियमकडे येणार आहेत. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, अहमदाबाद पोलिसांनी ३००० हून अधिक पोलीस कर्मचारी, एसआरपी (SRP) आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) तुकड्या तैनात केल्या आहेत. आज रात्रीपासूनच स्टेडियमकडे जाणारे मुख्य रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
चाहत्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून अहमदाबाद प्रशासनाने एक अतिशय मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. उद्या रात्री उशिरा १:३० वाजेपर्यंत ‘मेट्रो सेवा’ सुरू राहणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
तसेच, सायबर सेलने तिकिटांचा काळाबाजार (Black Marketing) आणि बनावट तिकिटे विकणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. सोशल मीडिया किंवा अनधिकृत ठिकाणांवरून तिकीट खरेदी केल्यास थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे. सुरक्षिततेच्या या अभूतपूर्व तयारीमुळे उद्याचा थरार निर्विघ्नपणे पार पडेल!
📌 महत्वाच्या बातम्या
- मायकल क्लार्कने बुमराहबाबत केली मोठी भविष्यवाणी! न्यूझीलंडच्या गोटात उडाली खळबळ
- डेल स्टेनने न्यूझीलंडची काढली लायकी! फायनलआधीच डिवचून उडवली खिल्ली
- सँटनरने फायनलआधी दिला थेट इशारा! भारतीयांची मने तोडण्यावर मोठं वक्तव्य
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








