Share

‘स्वागत नही करोगे हमारा?’ सलमान खानची २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर सुनामी

Salman Khan is set to dominate 2026 with back-to-back hits like Battle of Galwan, Kick 2, and Dabangg 4.

Published On: 

Salman Khan is set to dominate 2026 with back-to-back hits like Battle of Galwan, Kick 2, and Dabangg 4.

मुंबई – “टायगर अभी जिंदा है…” हे फक्त चित्रपटातील वाक्य नाही, तर सलमान खानच्या करिअरचं सत्य आहे! गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर भाईजानची जादू थोडी फिकी पडली की काय, अशी चर्चा सुरू असतानाच आता सलमानने २०२६ सालासाठी कंबर कसली आहे. शाहरुख पाठोपाठ आता सलमान खान (Salman Khan) बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक धमाके करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची आगामी चित्रपटांची यादी पाहून चाहत्यांनी आतापासूनच जल्लोष सुरू केलाय.

सलमानच्या या ‘मेगा प्लॅन’ची सुरुवात एका देशभक्तीपर चित्रपटाने होणार आहे. इनपुटनुसार, ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहात धडकणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सीमेवरील शौर्यगाथा आणि भाईजानचा ॲक्शन अवतार, हे समीकरण बॉक्स ऑफिसवर नक्कीच आग लावणार यात शंका नाही.

Salman Khan Upcoming Movies

ज्या चित्रपटाने सलमानला ‘डेव्हिल’ बनवलं, त्या ‘किक’चा सिक्वेल अर्थात ‘किक 2’ (Kick 2) लवकरच भेटीला येत आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत सलमान पुन्हा एकदा जादू करण्यासाठी तयार आहे. इतकेच नाही तर, चुलबुल पांडेची वर्दी पुन्हा एकदा चढवून ‘दबंग 4’ (Dabangg 4) मधून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

प्रेमळ सिनेमांचे जादूगार सूरज बडजात्या पुन्हा एकदा सलमानसोबत एक कौटुंबिक आणि रोमँटिक चित्रपट घेऊन येत आहेत. दुसरीकडे, वायआरएफच्या (YRF) स्पाय युनिव्हर्समध्ये पुन्हा एकदा ‘पठाण’ आणि ‘टायगर’ म्हणजेच शाहरुख-सलमानची जोडी धुमाकूळ घालताना दिसणार आहे.

याशिवाय, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये ‘मिशन चुलबुल सिंघम’ आणि मैत्री मुव्ही मेकर्सचा (Mythri Movie Makers) एक बिग बजेट साऊथ प्रोजेक्ट, असं सगळं ताट वाढून तयार आहे. २०२६ मध्ये तिकीट खिडकीवर फक्त आणि फक्त भाईजानचंच नाणं वाजणार, हे आता स्पष्ट दिसतंय!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install