Share

“लक्ष्मीकांत बेर्डे खूप मोठा माणूस होता, पण…”; उषा नाडकर्णींचा तो खुलासा, वाचून डोळ्यात येईल पाणी!

Actress Usha Nadkarni shares emotional memories of Laxmikant Berde, praising his humble nature despite massive fame, and critiques the industry.

Published On: 

Veteran actress Usha Nadkarni shares emotional memories of Laxmikant Berde, praising his humble nature despite massive fame, and critiques the industry.

मुंबई – लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही पाय जमिनीवर कसा ठेवायचा, हे फक्त एकाच माणसाला जमायचं… तो म्हणजे सर्वांचा लाडका ‘लक्ष्या’! मराठी सिनेसृष्टीत स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या स्वभावाचे असे काही पैलू उलगडले, जे ऐकून पुन्हा एकदा रसिक प्रेक्षक भावूक झाले आहेत.

Usha Nadkarni shares emotional memories of Laxmikant Berde

“त्याच्यात रत्तीभरही अहंकार नव्हता”

उषा ताई म्हणाल्या की, “बेर्डे खूपच मस्त माणूस होता. त्याला त्या काळात अफाट लोकप्रियता मिळाली होती, पण त्याच्यात रत्तीभरही अहंकार नव्हता.” आजकाल स्टारडम डोक्यात जाणाऱ्या कलाकारांच्या काळात लक्ष्याचा साधेपणा मनाला स्पर्श करणारा होता. नाटकाच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, “तो नेहमी चेष्टामस्करीत बोलायचा. अगदी लाईव्ह नाटकात विंगेत असतानाही तो माझं नाव घेऊन हाक मारायचा.” आजही सेटवर अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत, असंही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.

“मराठीत भाव नाही, हिंदीत प्रेम मिळतं…”

जुन्या आठवणीत रमताना उषा ताईंनी सध्याच्या मराठी इंडस्ट्रीला चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, “मराठीत मला कमी भाव दिला जातो, त्यामानाने हिंदीत जास्त प्रेम मिळतं.” इतकंच नाही तर, “मला कधीच कोणाकडे काम मागावं लागलं नाही आणि माझ्याकडे लोकांचे नंबरही नसतात,” असं सांगत त्यांनी आपला बाणेदारपणा पुन्हा एकदा दाखवून दिला.

मैत्री असावी तर अशी!

याच मुलाखतीत त्यांनी अलका कुबल (Alka Kubal) यांच्याशी असलेल्या मैत्रीचाही उल्लेख केला. “अलका आणि माझं आजही बोलणं होतं, आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्कात असतो,” असं सांगत त्यांनी जुन्या मैत्रीचा धागा अजूनही घट्ट असल्याचं सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही