🕒 1 min read
मुंबई – आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देतंच, फक्त ती ओळखता आली पाहिजे! मैदानावर आपल्या फटकेबाजीने गोलंदाजांना घाम फोडणारा भारतीय क्रिकेटचा ‘गब्बर’ म्हणजेच शिखर धवन (Shikhar Dhawan) आता वैयक्तिक आयुष्यातही नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झालाय. तीन वर्षांपूर्वीच्या घटस्फोटानंतर शिखर आता पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
सध्या सोशल मीडियावर शिखरच्या लग्नाचीच चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सोफी शाइन (Sophie Shine) हे येत्या फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे. हे लग्न दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) होणार असून, तयारी अगदी जोरात सुरू झाल्याचे समजते. हे लग्न खूप गाजावाजा न करता अत्यंत खाजगी स्वरूपात होणार असून, यात फक्त जवळचे मित्र आणि क्रिकेट विश्वातील काही दिग्गज हजेरी लावतील.
Shikhar Dhawan Second Marriage
तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिखरची ही ‘लेडी लव्ह’ नक्की आहे तरी कोण? तर, सोफी शाइन ही मूळची आयर्लंडची (Ireland) आहे. ती काही सेलिब्रिटी नाही, तर एक यशस्वी कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे. लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने शिक्षण पूर्ण केलंय. नुकताच युझवेंद्र चहलसोबतचा या जोडीचा एक रील व्हिडिओ व्हायरल झाला होता, आणि तेव्हापासूनच या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.
शिखर आणि सोफीच्या वयातील अंतराचीही जोरदार चर्चा आहे. शिखर सध्या ४० वर्षांचा आहे, तर सोफी शाइन ३५ वर्षांची आहे. म्हणजेच, दोघांच्या वयात ५ वर्षांचे अंतर आहे. शिखरच्या चाहत्यांना आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर शिखरने स्वतःला सावरलं आणि आता तो आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पाऊल टाकतोय. शिखरच्या या ‘दुसऱ्या इनिंग’साठी चाहते त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Bigg Boss Marathi 6 : रितेश भाऊ परत येतोय, 16 स्पर्धकांसह होणार ‘राडा’
- ‘बॉर्डर 2’ मध्ये वरुण धवनची हिरोईन कोण? तिच्या घरात ३ पिढ्यांनी घातलीये वर्दी; सत्य जाणून कराल सलाम!
- प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खरंच अंगात आलं होतं? ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर सुधा चंद्रन यांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












