Share

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खरंच अंगात आलं होतं? ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर सुधा चंद्रन यांचा संताप

Actress Sudha Chandran breaks silence on her viral ‘Mata Ki Chowki’ trance video, says she owes no explanation to trolls.

Published On: 

Actress Sudha Chandran breaks silence on her viral 'Mata Ki Chowki' trance video, says she owes no explanation to trolls.

मुंबई– श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा खूप पुसट असते, पण जेव्हा एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरात असं काही घडतं, तेव्हा भुवया उंचावल्या जातातच! आपल्या कसदार अभिनयाने आणि ‘नाचे मयुरी’ म्हणत नृत्याने जगाला जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudha Chandran) सध्या एका वेगळ्याच व्हिडिओमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या घरात आयोजित पूजेदरम्यान त्यांच्या ‘अंगात’ आल्याचा प्रकार समोर आला आणि नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या सगळ्यावर सुधा चंद्रन यांनी मौन सोडलं आहे.

Sudha Chandran Viral Video

काही दिवसांपूर्वी सुधा चंद्रन यांच्या घरी ‘माता की चौकी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिगीते आणि भजनाचा कार्यक्रम रंगात आला असतानाच अचानक सुधा चंद्रन बेभान झाल्या. त्यांचं शरीर कापू लागलं, त्या नाचू लागल्या आणि काही वेळातच बेशुद्ध पडल्या. उपस्थितांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि नेटकऱ्यांनी “हे सगळं नाटक आहे” म्हणत त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

या ट्रोलिंगने खचून जाणाऱ्यातल्या सुधा चंद्रन नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, “स्वत:बाबत कुणालाही, कोणतेही स्पष्टीकरण देणे मला गरजेचे वाटत नाही. मी उत्तरादाखल बांधील नाही.”

आपल्या आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देताना त्या म्हणाल्या, “जे लोक माझी थट्टा करत आहेत, त्यांनी खुशाल करावं. माझा अपघात झाला तेव्हाही लोक खूप काही बोलले होते, पण माझं यश बोललं. मी माझं आयुष्य देर्वाच्या आशीर्वादाने आणि अत्यंत आनंदाने जगले आहे. त्यामुळे लोक काय विचार करतात, याचा मी कधीही विचार करत नाही.”

एकीकडे हा व्हिडिओ अंधश्रद्धेचा भाग असल्याचं काही लोक म्हणत असले, तरी सुधा चंद्रन यांनी मात्र हे आपलं वैयक्तिक श्रद्धास्थान असल्याचं सांगत ट्रोलर्सना आपल्या ‘स्टाईल’मध्ये गप्प केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install