Share

“सोबत आलात तर ठीक, नाहीतर…”; आशिष शेलारांचा अजितदादांना ‘अल्टिमेटम’, युतीत मोठी ठिणगी?

Ashish Shelar warns Ajit Pawar to accept Savarkar’s ideology; NCP’s Amol Mitkari hits back citing Phule-Ambedkar values.

Published On: 

Tension in Mahayuti as BJP's Ashish Shelar warns Ajit Pawar to accept Savarkar's ideology; NCP's Amol Mitkari hits back citing Phule-Ambedkar values.

मुंबई– महायुतीत सगळं आलबेल आहे का? असा प्रश्न सध्या पडतोय, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या एका बड्या नेत्याने अजितदादांना थेट ‘अल्टिमेटम’ दिलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सावरकरांच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले आहेत. “आम्ही सावरकर भक्त आहोत, तुम्हालाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील,” अशा शब्दांत शेलारांनी अजितदादांना ठणकावलं आहे.

Ashish Shelar warns Ajit Pawar to accept Savarkar’s ideology

“तुमच्याशिवायही लढायला तयार…”

सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप तडजोड करणार नाही, हे स्पष्ट करताना शेलार म्हणाले, “तुम्ही याल तर तुमच्याबरोबर, नाही आलात तर तुमच्याविना! विरोधात गेलात तर विरोधात… आम्ही आमचं काम करत राहू.” शेलारांच्या या ‘आर या पार’च्या भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शेलारांचा वार फक्त पवारांवरच थांबला नाही, तर त्यांनी ठाकरे बंधूंनाही लक्ष्य केलं. “राजकारणात रसायनशास्त्र आणि अंकगणित चालत नाही. अनैसर्गिक युती झाली की स्फोट होतो,” असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे गट आणि मनसेत मोठी फूट पडली असून “दोन्ही भावांचे पक्ष मोडकळीस आले आहेत,” असा दावाही त्यांनी (Ashish Shelar) केला. संतोष धुरी आणि इतर नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा दाखला देत त्यांनी विरोधकांचे मनोधैर्य खचल्याचे संकेत दिले.

मिटकरींचं सडेतोड प्रत्युत्तर

आमदार अमोल मिटकरी यांनी शेलारांना जशास तसं उत्तर दिलंय. “आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांशी बांधील आहोत आणि राहू. आमची विचारधारा तुम्हाला पटत नसली तरी, तुम्हाला नाईलाजाने का होईना ती स्वीकारावीच लागते हे त्रिवार सत्य आहे,” असं सणसणीत प्रत्युत्तर मिटकरींनी दिलं आहे. आता भाजपच्या या ‘हिंदुत्ववादी’ आग्रहामुळे अजितदादांची कोंडी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही