Share

रितेशच्या ‘त्या’ एका वाक्याने भाजप नेत्याची हवा टाईट; रवींद्र चव्हाणांनी थेट माफीच मागितली!

BJP State President Ravindra Chavan apologizes to Riteish Deshmukh after facing backlash over his controversial remarks about late Vilasrao Deshmukh.

Published On: 

Actor Riteish Deshmukh gives a befitting reply to BJP leader Ravindra Chavan's remark on erasing Vilasrao Deshmukh's memories from Latur.

लातूर – शब्दांचा बाण सुटला आणि तो थेट वर्मी लागला की काय होतं, याचा प्रत्यय आज लातूरच्या राजकारणात आला. लातूरमधून दिवंगत विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, अशी वल्गना करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना (Ravindra Chavan) अवघ्या काही तासांतच ‘बॅकफूट’वर यावं लागलं आहे. अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) दिलेल्या संयमी पण खणखणीत उत्तरानंतर आता चव्हाणांनी सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे.

BJP Ravindra Chavan apologizes to Riteish Deshmukh

“रितेश माझा चांगला मित्र आहे…”

कालपर्यंत आक्रमक भाषण ठोकणाऱ्या रवींद्र चव्हाणांचा सूर आज पूर्णपणे बदललेला दिसला. रितेशच्या व्हिडिओनंतर निर्माण झालेला जनक्षोभ पाहून त्यांनी तातडीने सारवासारव केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी विलासरावांवर कोणतीही टीका केली नव्हती. ते मोठे नेते होते. रितेश हा माझा अत्यंत चांगला मित्र आहे. माझ्या बोलण्याने त्याच्या भावना दुखावल्या असतील, तर मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो.” इतकेच नाही तर, या विषयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नका, अशी विनंतीही त्यांनी रितेशला केली आहे.

नेमकं काय लागलं जिव्हारी? चव्हाणांना माफी का मागावी लागली? 

रितेश देशमुखचा तो व्हायरल व्हिडिओ! चव्हाणांनी जेव्हा विलासरावांच्या आठवणी पुसण्याची भाषा केली, तेव्हा रितेशने एका वाक्यात त्यांना आरसा दाखवला. “लिहिलेलं पुसता येतं, पण लोकांच्या मनावर कोरलेलं नाही,” या रितेशच्या वाक्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामान्य नेटकऱ्यांनीही रितेशच्या बाजूने उभे राहत भाजपला धारेवर धरले.

सुरवातीला “विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील” असं म्हणायचं आणि अंगाशी आल्यावर “मी विकासाच्या दृष्टीने बोललो होतो,” असं म्हणत यू-टर्न घ्यायचा, हा प्रकार आता लातूरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. रितेशच्या एका व्हिडिओने भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना माफी मागायला लावली, हे मात्र नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही