प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराला टार्गेट करून त्याला संपवण्याचा प्रयत्न कसा होतो, यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘निधनानंतर’ तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) केवळ त्यांच्यावरच निशाणा साधला नाही, तर आता चक्क दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh) प्रकरणाचा संदर्भ देत एक खळबळजनक दावा केला आहे. ‘माझ्याही हत्येचा प्रयत्न झाला होता,’ असं म्हणत तिने बॉलिवूडमधल्या एका मोठ्या ‘कंपू’वर (गँग) अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत.
कालच तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याबद्दल ‘इव्हिल डेड’ अशी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. व्यक्तीच्या मृत्यूनंतर असं बोलल्याने तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं. पण आता इन्स्टाग्रामवर तब्बल दोन तासांचा एक मोठा व्हिडीओ शेअर करत तिने ट्रोलर्सचा तर समाचार घेतलाच, शिवाय सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा थेट उल्लेख करत आपल्यासोबतही नेमकं असंच काहीसं घडल्याचा दावा तिने केला आहे.
Tanushree Dutta on Sushant
या व्हिडीओमध्ये बोलताना तनुश्रीने अतिशय धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतला ज्याप्रमाणे एका विशिष्ट ग्रुपने टार्गेट करून त्रास दिला, तसाच भयानक अनुभव आपणही या इंडस्ट्रीत घेतल्याचं ती सांगते. “मला त्रास देण्यामागे फक्त एक व्यक्ती नव्हती, तर बॉलिवूडचा एक अख्खा ग्रुप होता. हे लोक खूप जुने खिलाडी आहेत. जेव्हा सुशांतची घटना घडली, तेव्हाच मला जाणवलं होतं की हे सगळं सामान्य नाहीये,” असं ती स्पष्ट म्हणाली.
दुसरीकडे, या वादाच्या पार्श्वभूमीवर तनुश्रीने थेट स्वतःच्या जिवावर बेतल्याचे प्रसंगही सर्वांसमोर मांडले आहेत. मला संपवण्यासाठी माझ्या घरात मुद्दाम एक मोलकरीण ठेवली गेली होती आणि कारचा अपघात घडावा म्हणून ब्रेकही फेल करण्यात आले होते, असा गंभीर आरोप तिने लावला. “जेव्हा व्यक्ती एकटी असते, तेव्हा देव तिच्या पाठीशी असतो आणि प्रत्येकाला कर्माचा हिशेब द्यावाच लागतो,” असं म्हणत तिने नानांच्या ‘मृत्यू’ची तुलना थेट चमत्काराशी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मैं ज़िंदगी का साथ…’, नानांच्या आठवणीत बिग बी भावूक, शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ
- मेट्रो आणि रेल्वे बंदीवरून अभिजीत दीपकेंचा संताप; म्हणाले, ‘मोदीजी, बीपी चेक करत राहा’
- महाराष्ट्रावर ‘तिहेरी’ संकट! पुढील २४ तास धोक्याचे, हवामान खात्याचा अलर्ट जारी
Quick Answers
सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच आपल्यालाही एका विशिष्ट ग्रुपने टार्गेट करून त्रास दिला, असा दावा तनुश्री दत्ताने केला आहे. तसेच आपल्या हत्येचाही प्रयत्न झाला होता, असा आरोप तिने बॉलिवूडमधील एका ग्रुपवर केला आहे.
तिला संपवण्यासाठी घरात मुद्दाम एक मोलकरीण ठेवली गेली होती आणि कारचा अपघात व्हावा म्हणून ब्रेकही फेल करण्यात आले होते, असा गंभीर आरोप तनुश्रीने केला आहे.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याबद्दल ‘इव्हिल डेड’ अशी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती, ज्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








