Share

Bigg Boss Marathi 6 : राजकीय एन्ट्रीवर रितेश भाऊंचा ‘तो’ डायलॉग व्हायरल!

Riteish Deshmukh’s witty reply on potential political entries in Bigg Boss Marathi 6 goes viral ahead of the Jan 11 launch.

Published On: 

Riteish Deshmukh’s witty reply on potential political entries in Bigg Boss Marathi 6 goes viral ahead of the Jan 11 launch.

मुंबई – एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत आहेत, तर दुसरीकडे मनोरंजनाच्या विश्वात ‘बिग बॉस’ची हवा झाली आहे. पण राजकारण आणि बिग बॉस यांचा मेळ घातला तर काय होईल? असाच काहीसा प्रश्न जेव्हा ‘लय भारी’ होस्ट रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) विचारला गेला, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने एकाच हशा पिकला. सध्या रितेशच्या या ‘टायमिंग’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Bigg Boss Marathi 6 पर्वाची दारं उघडायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. ११ जानेवारीला हा शो सुरू होतोय. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत रितेशला विचारण्यात आलं की, “भाऊ, यंदा निवडणुकीचे वारे आहेत, मग घरात एखादी ‘राजकीय एन्ट्री’ पाहायला मिळणार का?” यावर रितेशने (Riteish Deshmukh) क्षणाचाही विलंब न लावता मिश्किल उत्तर दिलं. तो म्हणाला, “ज्यांना पार्टीचं तिकीट मिळालं नाही, त्यांना इकडे आणणार मी…”

Bigg Boss Marathi 6

त्याने पुढे स्पष्ट केले की, “अजून मलाही माहित नाही की घरात नक्की कोण आहे. पण एखाद्याला बाहेर तिकीट मिळालं नाही, म्हणून इथे मिळेलच असं नाही.” यावेळी माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकर (Janhvi Killekar) हिने तर कहरच केला. ती म्हणाली, “राजकीय पक्षाचं तिकीट मिळवणं सोपं आहे, पण बिग बॉसचं नाही.”

आता खरी उत्सुकता आहे ती स्पर्धकांची!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावरील चर्चेनुसार, ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे, अंशुमन विचारे आणि दीपाली सय्यद यांची नावे आघाडीवर आहेत. दीपाली सय्यद यांचा राजकीय वावर पाहता, त्या बिग बॉसमध्ये दिसल्या तर नवल वाटायला नको.

येत्या ११ जानेवारीपासून रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर हा ड्रामा सुरू होणार आहे. यंदा २२ ते ५५ वयोगटातील स्पर्धक असल्याने घरात ‘जनरेशन गॅप’चा राडा नक्कीच पाहायला मिळेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही