मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याला लग्नाची इच्छा भोवली; परदेशी नवरदेवाच्या आमिषाने गमावले १७ लाख रुपये

परदेशी नवरा शोधणे मंत्रालयातील एका महिला अधिकाऱ्याला महागात पडले असून, दोन भामट्यांनी त्यांची १७ लाख ९७ हजारांची फसवणूक केली आहे.

Published On: 

Cyber crime conceptual image showing a defrauded female officer and matrimonial fraud

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: ‘शादी डॉट कॉम’ या विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून मंत्रालयातील एका महिला अधिकाऱ्याची तब्बल १७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाइन माध्यमातून जोडीदार शोधण्याची या अधिकाऱ्याची इच्छा त्यांना भलतीच महागात पडली आहे.

सीमा (नाव बदललेले) असे या पीडित महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या मंत्रालयातील एका विभागात कार्यरत आहेत. लग्नासाठी त्यांनी ऑनलाइन संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर सुनील आणि विशाल नावाच्या दोन व्यक्तींनी त्यांना लग्नासाठी इच्छुक असल्याचे सांगत संपर्क साधला.

यातील सुनील याने स्वतःला यूकेचा नागरिक असल्याचे भासवले, तर विशाल याने आपण कॅनडाचा रहिवासी असल्याची बतावणी केली. दोघांनीही सीमा यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त करत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी सीमा यांना ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडले.

या दोन्ही भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून महिला अधिकाऱ्याने त्यांना एकूण १७ लाख ९७ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही