Share

बावनकुळेंनी हद्दच केली! महापुरुषांच्या समोर ‘अश्लील’ डान्स, वरून म्हणाले – “हा तर महिलांचा आनंद!”

Chandrashekhar Bawankule defends a viral video of a woman dancing at a Mumbai campaign event

Published On: 

Chandrashekhar Bawankule defends a viral video of a woman dancing at a Mumbai campaign event

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात यूपी-बिहारचं वारं कधी शिरलं हे कळलंच नाही, पण मुंबईत जे घडलंय ते पाहून तुमच्याही कपाळावर आठ्या पडल्याशिवाय राहणार नाहीत. निवडणुकीत मतदारांना खुश करण्यासाठी नोटा वाटल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत, पण आता चक्क ‘बार स्टाईल’ डान्सचा वापर सुरू झालाय की काय? असा प्रश्न पडलाय. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकारावर कारवाई करण्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलेलं उत्तर ऐकून तुम्हीही अवाक व्हाल!

नेमकं काय घडलं?

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मध्ये भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचारासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजक होते स्वतःला ‘आचार्य’ म्हणवणारे भाजप नेते पवन त्रिपाठी (Pawan Tripathi). स्टेजवर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा होत्या, तर समोर एक महिला ‘लैला मैं लैला’ गाण्यावर थिरकत होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी हा व्हिडीओ ट्विट करत भाजपचा बुरखा टराटरा फाडलाय. “महापुरुषांच्या साक्षीने नाचगाणी करून गर्दी जमवणे, हीच का तुमची संस्कृती?” असा रोखठोक सवाल त्यांनी विचारलाय.

या लज्जास्पद प्रकारावर माफी मागायची सोडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्क या कृत्याची पाठराखण केली आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारताच बावनकुळे म्हणाले, “आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला तर एवढं बोलायची गरज काय आहे? शेवटी हा महिलांचा आनंद आहे.”

बावनकुळेंच्या (Chandrashekhar Bawankule) या विधानाने आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. प्रचारात ‘भोजपुरी स्टाईल’ ठुमके लावणं हा कोणता ‘आनंद’ आहे, हे कोडं सर्वसामान्यांना पडलंय. यूपी-बिहारमध्ये मते मिळवण्यासाठी असले फंडे वापरले जातात, पण महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात हे ‘कल्चर’ रुजवण्याचा प्रयत्न भाजप करतंय का? हिंदी भाषिक मतदारांना खुश करण्यासाठी महापुरुषांचा अवमान कितपत योग्य आहे? आता जनताच याचं उत्तर देईल.

पुढील लिंकवर क्लिककरून वादग्रस्त व्हिडिओ पहा – https://x.com/akhil1485/status/2008325608401760454?s=20

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही