Share

Heart Health: जिम नको, कडक डाएट नको; दिवसाला फक्त ‘इतकी’ पावलं चाला, हार्ट अटॅकचा धोका होईल छुमंतर!

A study reveals that walking 6,000 to 9,000 steps daily significantly reduces the risk of cardiovascular diseases, especially in people over 60.

Published On: 

Walking Benefits: A study reveals that walking 6,000 to 9,000 steps daily significantly reduces the risk of cardiovascular diseases, especially in people over 60.

Walking Benefits: तुम्ही दिवसाला किती पावलं चालता? कधी मोजली आहेत का? नसेल तर आताच मोजायला सुरुवात करा, कारण ही साधी सवय तुमचा जीव वाचवू शकते. सध्याच्या धावपळीच्या युगात ‘हार्ट अटॅक’ हा शब्द कानावर पडला की धस्स होतं, पण आता एका नव्या संशोधनाने मोठा दिलासा दिला आहे.

भारतीयांची स्थिती आणि WHO चा इशारा आपल्याकडे व्यायामाचा कंटाळा करण्याची सवय जरा जास्तच आहे, नाही का? जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट सांगितलंय की आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम हवाच. पण, धक्कादायक वास्तव हे आहे की ५० टक्क्यांहून अधिक भारतीय हे साधे नियमही पाळत नाहीत. अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स विद्यापीठा’तील (UMass) संशोधक शिवांगी बाजपेयी यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवलंय. भारतात मार्गदर्शक तत्त्वांबद्दलची जागरूकता कमी आहे, त्यामुळे जिममध्ये जाऊन हेवी वेट्स उचलण्यापेक्षा ‘पायऱ्या चढणे’ किंवा ‘चालणे’ यांसारख्या सोप्या गोष्टींवर भर देणं गरजेचं आहे.

संशोधन नेमकं काय सांगतं?

शिवांगी बाजपेयी आणि डॉ. अमांडा पालुच यांनी ४२ देशांतील तब्बल २० हजारांहून अधिक लोकांच्या डेटाचा अभ्यास केला. यात समोर आलंय की, जर तुम्ही वयाच्या साठीत असाल (६०+), तर दररोज ६,००० ते ९,००० पावलं चालणं तुमच्या हृदयासाठी संजीवनी ठरू शकतं.

तुम्ही म्हणाल, यात नवीन काय? तर फरक पडतो!

अभ्यासानुसार, जे लोक दिवसाला फक्त २,००० पावलं चालतात, त्यांच्या तुलनेत ६ ते ९ हजार पावलं चालणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या कमी असतो.

थोडक्यात काय तर… हृदय तंदुरुस्त ठेवायचं असेल तर खूप काही करण्याची गरज नाही. फक्त बुटांची लेस बांधा आणि चालायला लागा. लिफ्टचा मोह टाळा आणि पायऱ्या चढा. कारण, तुमची प्रत्येक पाऊल तुम्हाला निरोगी आयुष्याकडे घेऊन जाणार आहे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही