Share

‘सत्ता आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’; अमिताभ बच्चन यांच्याबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

अमिताभ बच्चन यांनी भूतकाळात मोठा त्रास सहन केला असून ते वाद टाळून शांततेचा मार्ग स्वीकारतात, असे परेश रावल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

Published On: 

Rawal-Bachchan

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत परेश रावल (Paresh Rawal) यांनी अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक मते मांडली आहेत. याच मुलाखतीत त्यांनी बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले परेश रावल?

बच्चन यांच्याबद्दल परेश रावल यांचे विधान

पत्रकार विकी लालवानी यांच्याशी बोलताना परेश रावल म्हणाले की, “आजकाल लोक घाबरलेले असतात. सत्तेत असलेल्यांकडून आपल्याला त्रास होईल, अशी भीती त्यांना वाटते. पूर्वी काही लोक अतिशय निर्भयपणे बोलायचे. पण जर तुम्ही खोलवर विचार केला, तर काळाच्या ओघात अशा लोकांची संख्या खूप कमी झाली आहे.”

परेश रावल पुढे म्हणाले, “या वयात अमिताभ बच्चन काय करणार? व्ही.पी. सिंग प्रकरणादरम्यान लोकांनी त्यांना कशा प्रकारे अडचणीत आणले होते, हे त्यांनी जवळून पाहिले आहे. सत्ता जर तुमच्या मागे लागली, तर ती तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्या काळात अमिताभ बच्चन यांनी काय सोसले असेल, हे आपल्याला माहित नाही. त्यांनी खूप त्रास सहन केला आहे.”

“अमिताभ संघर्षावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना शांतता आवडते. ते हात जोडून वाद तिथेच संपवतात. पण अनेक लोकांना ही त्यांची कमतरता वाटते. अमिताभ यांना आपल्या आसपास भांडणे किंवा नकारात्मकता अजिबात आवडत नाही,” अशा शब्दांत परेश रावल यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आपली स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही