Share

‘मला बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण…’; प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ एका वक्तव्याने खळबळ!

प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडण्यामागील सत्य अखेर उघड केले आहे. तिला बाहेर संधी शोधण्यासाठी कसे भाग पाडले गेले, याचा धक्कादायक खुलासा तिने केलाय.

Published On: 

Priyanka Chopra Interview: प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा!

बॉलिवूडमध्ये टॉपवर असताना अचानक हॉलीवूडचा रस्ता का धरला? हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच. आता खुद्द प्रियांकानेच यावर मोठा गौप्यस्फोट केला असून, संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

‘मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण मला बाहेर संधी शोधण्यासाठी अक्षरशः ढकलण्यात आलं,’ असा धक्कादायक खुलासा ‘देसी गर्ल’ने केला आहे. ‘फर्स्टपोस्ट’ला दिलेल्या ताज्या मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूड टू हॉलिवूड या प्रवासावर उघडपणे भाष्य केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असताना तिथे तिला मर्यादा जाणवू लागल्या होत्या. “मला पुढे जायचं होतं, प्रगती करायची होती. एक कलाकार म्हणून नवीन संधी शोधण्यासाठी माझ्यावर दबाव होता,” असं तिने स्पष्ट केलं.

Priyanka Chopra Interview

अमेरिकेत काम सुरू केल्यानंतरचा काळ अजिबात सोपा नव्हता. जवळपास १२ वर्षांनंतर आता कुठे मला खरोखरच अद्भुत काम निवडण्याची गती मिळत आहे, अशी प्रांजळ कबुली प्रियंकाने दिली आहे.

दोन्हीकडे काम करण्याचा अनुभव सांगताना ती म्हणाली की, “मला आपले भारतीय चित्रपट खूप आवडतात. दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये काम करणं वेगळं आहे. तिथली संस्कृती वेगळी आहे, पण आता माझा मेंदू दोन वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकतो, ही खरोखर एक अनोखी आणि मजेदार गोष्ट आहे.” प्रियांका आता Priyanka Chopra Hollywood प्रोजेक्ट्समध्ये चांगलीच स्थिरावली आहे.

‘क्वांटिको’ या मालिकेतून सुरू झालेला तिचा हॉलिवूडचा प्रवास आता ‘सिटाडेल’, ‘हेड्स ऑफ स्टेट’ आणि ‘द ब्लफ’सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सपर्यंत पोहोचलाय. २५ फेब्रुवारीला तिचा ‘द ब्लफ’ हा सिनेमा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, तब्बल ८ वर्षांनंतर प्रियांका एस. एस. राजामौली यांच्या बहुचर्चित ‘वाराणसी’ चित्रपटातून भारतीय सिनेसृष्टीत दमदार पुनरागमन करत आहे. एप्रिल २०२७ मध्ये येणाऱ्या या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन हे तगडे स्टार्स दिसणार आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install