Share

भारतीय लेकींचा श्रीलंकेला धोबीपछाड; राधा-वृंदाच्या वादळाने उडाली खळबळ, आता फायनलची उत्सुकता!

महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. राधा यादव आणि वृंदा दिनेशच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दिमाखात फायनल गाठली.

Published On: 

INDW vs SLW Asia Cup: भारताची फायनलमध्ये धडक!

क्रिकेटच्या मैदानात भारतीय लेकींनी सध्या असा काही धुमाकूळ घातलाय, की प्रतिस्पर्धी संघांना चक्क घाम फुटलाय! बँकॉकच्या मैदानात भारताच्या युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

सध्या थायलंडमध्ये ‘Women’s Asia Cup Rising Stars 2026’ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला (INDW vs SLW) ‘अ’ संघाने श्रीलंकेचा ५ विकेट्स राखून असा काही धुव्वा उडवला, की संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच चर्चा सुरू झाली आहे. या एकतर्फी विजयामुळे टीम इंडियाने थेट फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.

INDW vs SLW Asia Cup

उपांत्य सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. भारतीय गोलंदाजांच्या अचूक आणि भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत अवघ्या ११८ धावांवर ढेपाळला. कर्णधार राधा यादवने १९ धावांत ४ बळी घेत अक्षरशः लंकादहन केलं. तिला प्रेमा रावत (२/९) आणि तनुजा कंवर (२ बळी) यांनी मोलाची साथ दिली.

११९ धावांचं हे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय लेकींनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. ३० धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्माने २४ चेंडूत ४७ धावांची तुफानी भागीदारी केली. वृंदा दिनेशने अवघ्या २० चेंडूत ४२ धावा चोपून काढत मैदानात आग ओकली. तिच्या या वादळी खेळीमुळे भारताने हे लक्ष्य १३.३ षटकांतच आरामात गाठलं.

आता सर्वांच्या नजरा २२ फेब्रुवारीला होणाऱ्या महाअंतिम फेरीकडे लागल्या आहेत. फायनलमध्ये भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान किंवा बांगलादेशसोबत होण्याची दाट शक्यता आहे. आता फायनलमध्ये भारतीय लेकी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात, हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही