Share

“नवरा असावा तर असा”, प्रियांकाने नशीब काढलं; निक जोनासच्या ‘त्या’ कृतीने इंटरनेटवर मोठी खळबळ!

प्रियांका चोप्राच्या आगामी ‘द ब्लफ’ सिनेमाचे प्रमोशन करताना निक जोनासने चक्क हातात मंगळसूत्र ब्रेसलेट म्हणून घातले. या कृतीने त्याने भारतीयांची मनं जिंकली आहेत.

Published On: 

Priyanka Chopra Nick Jonas: हातात चक्क मंगळसूत्र!

प्रेम व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, पण निक जोनासने बायकोसाठी जे केलंय ते पाहून अनेकांना सुखद धक्का बसेल! ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास हे ग्लोबल कपल नेहमीच चर्चेत असतं. पण सध्या सोशल मीडियावर निकच्या एका नव्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगलीये. या व्हिडिओमध्ये निकने असं काही केलंय की, त्याने थेट भारतीय चाहत्यांच्या काळजालाच हात घातलाय.

झालं असं की, प्रियांका चोप्राचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘The Bluff’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बायकोच्या या नव्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यासाठी निकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला. यात तो सिनेमाच्या थीमवर आधारित ‘ब्लडी मेरी’ नावाचे कॉकटेल बनवताना दिसतोय.

Priyanka Chopra Nick Jonas

पण खरा मोठा गौप्यस्फोट तेव्हा झाला, जेव्हा तो ड्रिंक बनवत होता. नेटकऱ्यांची करडी नजर थेट त्याच्या हातावर गेली. निकने चक्क प्रियांकाचं मंगळसूत्र स्वतःच्या हाताभोवती ब्रेसलेटसारखं गुंडाळलं होतं! बायकोच्या मंगळसूत्राचा असा वापर पाहून सुरुवातीला अनेकांना धक्का बसला, पण त्यामागचं प्रेम पाहून सारेच भारावले.

हॉलिवूडचा एवढा मोठा स्टार, पण भारतीय संस्कृतीचा आणि पत्नीच्या दागिन्याचा असा सन्मान करताना पाहून चाहते पुरते खुश झाले आहेत.  एका चाहत्याने लिहिलंय, “निक जिजू खरोखरच ग्रीन फ्लॅग (आदर्श पती) आहेत!” तर अनेकांनी त्याच्या या कृतीला खऱ्या प्रेमाचं लक्षण म्हटलं आहे. “नवरा असावा तर असा”, अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

या व्हिडिओत निकने प्रियांकाच्या सिनेमाचं तोंडभरून कौतुकही केलंय. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर पाहण्यासारखा असून आपण तो स्वतः दोनदा पाहिल्याचा खुलासा त्याने केलाय. पण सध्या प्रियांकाच्या सिनेमापेक्षा Priyanka Chopra Mangalsutra आणि निकच्या या अनोख्या ‘देसी’ प्रेमाचीच इंटरनेटवर जास्त खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही